लोकसभा निवडणूकीसाठी सांगली पोलीस दल सज्ज : गुंडांविरोधात ऍक्शन प्लॅन तयार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सांगली पोलीस सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणूक कामासाठी सर्वात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणूक शांततेतच पार पडणार आहे. यात कोणालाही कशाही प्रकारची सूट दिली जाणार नाही तसेच येणाऱ्या निवडणुका या भीतीने नाही तर उत्सवाप्रमाणे पार पडतील असा विश्वास सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी व्यक्त केला.

सांगली जिल्ह्यात सुरक्षेसाठी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण २४०० निवडणूक केंद्रे आहेत. या केंद्र आणि परिसराच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात राहणार आहे. यामध्ये स्पेशल पथक, जलदकृती दल, राखीव दल यासह मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे. या वर्षात तीन टोळ्या तडीपार करण्यात आल्या. यामध्ये १६ आणखी टोळ्या हदपारीच्या रडारवर असून १०० हुन अधिक गुन्हेगारांना तडीपार केले जाणार आहे. मोक्याचे पाच प्रस्ताव २०१९ मध्ये तयार केले आहेत. यामध्ये २७ गुन्हेगार आहेत. निवडणूक हा उत्सव म्हणून साजरा व्हावा असे वातावरण निर्माण करणार असल्याचे सांगत गुन्हेगारामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आहे.

एका गुन्ह्यापासून तीन गुन्हे असणाऱ्या सर्वांवर कारवाई होणार आहे. जेलमधून सुटलेल्या सर्वांवर सुद्धा गोपनीय पथकाद्वारे लक्ष ठेवले जात आहे. सांगली मुख्यालयात स्वतंत्र निवडणूक कक्ष स्थापन केला आहे. यातून संपूर्ण निवडणूक बाबत जिल्हा आणि राज्य स्तरावर या कक्षातून समन्वय साधला जाईल. यासह निवडणूक काळात सर्व आस्थापना या वेळेवरच बंद होतील याबाबत सर्वाना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुका निर्भयपणे आणि शांततेतच पार पडतील असा दावाही पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केला आहे.

Leave a Comment