आश्रम शाळेतील 170 मुलांना विषबाधा; सांगलीतील घटनेनं खळबळ

Poisoning Children sangali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रम शाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. समता आश्रम शाळेत ही घटना घडली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर प्रशासनही जागे झालं असून २४ तासांत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, जेवणातील बासुंदीतून या … Read more

पठ्ठ्यांनी थेट JCB नेच फोडले ATM; मशिनमध्ये 27 लाख रोख रक्कम (Video)

सांगली | आरग ( तालुका मिरज ) येथे जेसीबीच्या सहाय्याने ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा अजब प्रकार घडला आहे. त्यामुळे गावात मोठी खळबळ माजली. ही घटना शनिवारी मध्य रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. सदर एटीएम मध्ये 27 लाखांची रोख रक्कम रोकड होती. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. मध्य रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. एटीएम च्या … Read more

खाजगी सावकारीसह खंडणीचा गुन्हा; गुंड छोट्या बाबरला महिला पोलिसाचीही साथ

सांगली | सांगलीतील गावभाग मध्ये राहणार्‍या एका तरुणाने व्याजाने घेतलेले 1 लाख रुपये व्याजासह 2 लाख 7 हजार रुपये देऊनही अधिकचे चार लाख रुपये देण्यासाठी चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी गुंड छोट्या बाबरसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका महिला पोलिसाचा देखील … Read more

महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करून नंतर…’त्या’ पेट्रोल पंपावर नेमकं घडलं काय??

Petrol Pump

सांगली | पेट्रोल पंपावर कामाला असलेल्या महिला कर्मचाऱ्याने उधार पेट्रोल न दिल्याचा रागातून रेकॉर्डवरील आरोपीने सदर महिलेचा विनयभंग करत तिला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील संजयनगर येथील खेराडकर पेट्रोल पंपावर घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास संशयित मोटे हा पेट्रोल … Read more

चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी भाजपाकडून सांगली शहर पोलीस अधीक्षकांना निवेदन

सांगली | सांगली शहरात काही महिन्यांपासून घरफोड्या, मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, वाटमारी तसेच मुलींवर होत असलेल्या छेडछाडी बाबत असे अनेक गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका सविता मदने, महिला मोर्चा प्रदेश … Read more

CRIME NEWS : इन्स्टाग्रामवर मैत्री अन् नंतर बलात्कार करुन केलं प्रेग्नंट

सांगली | इन्स्टाग्राम अ‍ॅपद्वारे मैत्री संबंध वाढवून विवाहाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी जयदीप जयपाल चौधरी यास अटक केली. पीडित अल्पवयीन मुलीची जानेवारी 2021 मध्ये मोबाईल इन्स्टाग्राम अ‍ॅपवर जयदीप चौधरी याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघेही चॅटिंग करत होते. जयदीपने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मार्च 2021 मध्ये पीडित मुलगी … Read more

थरारक घटना : पत्नीचा पाठलाग करून पतीने काढला काटा

सांगली प्रतिनिधी |  मूळ गावी राहण्यास जाण्याच्या कारणावरून झालेल्या पती – पत्नीच्या वादात पतीने पत्नीच्या पोटात चाकूने भोसकून खून केल्याची घटना आज सकाळी विटा येथील बर्वे मळ्यानजीक घडली. लिलावतीदेवी नरेश साह असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती नरेश रघुवीर यास ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. बिहार राज्यातील नवादाखास येथील हे परप्रांतीय कुटुंब आहे. लिलावती … Read more

सांगलीत वाळू माफिया झाले मुजोर ! निंबवडेत एक सर्वसामान्य शेतकऱ्याला केली मारहाण

valu mafia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर वाळू माफियांचा सध्या मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे.या माफियांनी अनेक ठिकाणी धुडगूस घालायला सुरुवात केली आहे.याचं ताजं उदाहरण सांगलीतल्या आटपाडी तालुक्यातील निंबवडे गावात घडलंय. निंबवडे गावातील एक सर्वसामान्य शेतकरी विजय पिंजारी हे सोमवारी (ता.०१) रोजी आपल्या शेतात काम करत होते.शेताला लागूनच असलेल्या ओढ्यात प्रदीप बुधावले आणि लक्ष्मण बुधावले हे दोन वाळू … Read more

सेंट्रींग कामगाराचा डोक्यात दगड घालून खून; पँट मृतदेहापासून बाजूला सापडली

सांगली | इस्लामपूर-कापूसखेड मार्गावर दोन नंबर टेकडीजवळ मदिना कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावर राजेश सुभाष काळे या सेंट्रीग कामगाराचा डोक्यात दगड घालून निघृण खून करण्यात आला. रविवारी रात्री झालेला खूनाचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या खून प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गतीने तपास सुरू होता. मात्र पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती आले नव्हते. इस्लामपूर-नेहरूनगर परिसरात राजेश काळे हा पत्नीसह … Read more

तेरा पानी रम्मी जुगार अड्डा पोलिस पथकाने केला उध्वस्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील कर्नाळरोडवर असणाऱ्या एका इमारतीच्या खोलीत सुरु असलेला तेरा पानी रम्मी जुगार अड्डा सांगली शहर पोलिसांच्या पथकाने उध्वस्त केला. पोलिसांनी या ठिकाणाहून २१ जणांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जितेंद्र किसन पळसे याच्या ऑफिस मध्ये हि कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ६० हजारांचे मोबाईल, ६ हजार ४०० … Read more