सांगली प्रतिनिधी / स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विशाल पाटील यांनी वसंतदादा कारखान्याच्या शेतकरी आणि कामगारांचे कोट्यावधी रुपयांची देणी बुडवली आहेत. शेतकऱ्यांना फसविणाऱ्याना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता खासदार राजू शेट्टी यांनी विशाल पाटील यांच्या देण्यांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी केले.
वसंतदादा घराण्याचे वारसदार म्हणून स्वाभिमानी त्यांची निवड केली आहे, पण वारसदाराने दादांच्या चांगल्या चाललेल्या संस्था बंद पडल्या आहेत. कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांची देणी बुडवली असताना त्याकडे स्वाभिमानीने दुर्लक्ष का केले? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. वसंतदादा कारखान्याला वर्षानुवर्षे ऊस पाठवणारे हजारो शेतकरी देशोधडीला लागले आहेत, मात्र राजू शेट्टींना असे कोणते संबंध दादा घराण्यात दिसून आले आता प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जाणाऱ्या शेट्टींना शेतकऱ्यांच्या देणी पुरवणाऱ्या विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात रस काय आहे, हे आता जनता आणि शेतकऱ्यांनाही समजले आहे. शेट्टी यांच्या आंदोलनातील योगदानाची आणि कदर करतो. त्यांनी विशाल पाटील यांच्याकडून शेतकऱ्याची देणी देण्यास भाग पाडावे. त्याची जबाबदारी ही खासदार शेट्टींनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
इतर महत्वाचे –
परभणीत हळद उत्पादन निम्याने घटले