पुणे प्रतिनिधी | संत तुकाराम महाराजांची पालखी आज निवडुंग्या विठ्ठल मंदिर पुणे येथून पंढरपुरच्या दिशेने निघाली. सकाळी ६ वाजता आरती झाल्यानंतर पालखीने पुढील प्रवास सुरु केला. पुण्यात दोन दिवस मुक्काम केलेले वारकरी पाहते ३ वाजल्या पासूनच पुढील प्रवासासाठी सज्ज झाले होते. आरती होताच आपापल्या दिंड्या सज्ज करून वारकरी पुढील प्रवासासाठी पंढरीच्या दिशेने निघाले.
पुलगेटमार्गे हडपसर येथे पालखी निघाली. वाटते दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काही समाजसेवी संस्थांनी वारकरी बांधवासाठी फळआहार वाटपाची व्यवस्था केली होती. तर काही वैद्यकीय संस्थांनी वारकरी बांधवासाठी वैद्यकीय सेवा देण्याचा उपक्रम देखील राभवला होता.
हडपसर येथे विसावा घेवून तुकाराम महाराजांची पालखी लोणीच्या दिशेने गेली. तुकाराम महाराजांच्या पालखीवर आज निरंतर पावसाचा जलाभिषेक होत होता. पावसाच्या साक्षीनेच आज वारकऱ्यांनी आपला प्रवास पूर्ण केला. तर लोणी काळभोर येथे मोठ्या उत्सहात तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. लोणी काळभोर येथे पालखी दाखल होताच गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.