दिल्लीत २ संशयित दहशतवादी घुसले

Terrorists
Terrorists
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | दिल्लीत दोन संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे दिल्ली आणि परिसरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सदरील दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे असून त्यांचे फोटोही दिल्ली पोलिसांनी जाहिर केले आहेत. यामुळे दिल्लीवासीयांमधे एकच खळबळ उडाली आहे.

दहशतवाद्यांच्या शोधासाठी पोलिसांनी गेस्ट हाऊस आणि हॉटेल्ससह अनेक ठिकाणी छापे मारणे सुरू केले असून याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या दोन्ही दशतवाद्यांचे फोटो संपूर्ण दिल्लीत लावण्यात आले आहेत. या फोटोत हे दोन्ही दहशतवादी एका माइलस्टोनजवळ उभे आहेत. त्यावर दिल्ली ३६० किलोमीटर दूर तर फिरोजपूर ९ किलोमीटर दूर असल्याचं लिहिलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत जैश-ए-मोहम्मदचे ७ अतिरेकी घुसल्याच्या शक्यतेने दिल्लीत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज पुन्हा दोन अतिरेकी घुसल्याची माहिती आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.