नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ चित्रपट या तारखेला होणार प्रदर्शित

0
51
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झुंड’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांची मुख्य भुमिका आहे. नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चान यांच्या समीकरणांची सगळे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आज जाहीर करण्यात आली.येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हा चित्रपट नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवावर आधारित आहे.नागराज मंजुळे यांनी गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा केली होती.बारसे हे झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवतात. या चित्रपटात शिक्षकाच्या भुमिकेत अमिताभ बच्चन आपल्याला दिसणार आहेत.

अमिताभ बच्चन यांनी तारखा उपलब्ध नसल्याने हा चित्रपट नाकारला होता. चित्रीकरणादरम्यान या चित्रपटला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. अनेक अडचणीनंतर ‘झुंड’ चे चित्रीकरण नागपुरात यशस्वीरित्या पार पडले.

इतर महत्वाचे-

भारताला पाक कडून ही धमकी ..

‘मी’ स्वबळावर लढणार ….

राज्यात युती …..तरी जिल्ह्यात चुरशीची लढत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here