अवघ्या नऊ मिनिटात पिला तब्बल ‘४५ कप चहा’

0
60
प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पैज शब्दातच आव्हान आहे अनेक जण हा पैजेचा विडा उचलण्यासाठी जीवावर उदार आणि बेभान ही होतात. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील मित्रांमध्ये लागलेली अशीच एक अनोखी पैज सध्या सर्वच सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. गप्पा मारताना मित्रांनी लावलेली एक हजार रुपयांची पैज जिंकण्यासाठी एका युवकाने ९ मिनिटात ४५ चहा पिऊन टाकून एक अजब गोष्ट करून दाखवली.

या पैजेचा चहा पितानाचा या युवकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सचिन सोपान शिंदे असे या युवकाचे नाव आहे. गप्पा रंगल्या आणि पैज लागली यामध्ये चहा पिऊन संपविण्याचा आत्मविश्वास असणाऱ्या सचिनने हा पैजेचा विडा उचलला केवळ पैजेचा विडा उचलून न थांबता गावातील चहाच्या हॉटेलमध्ये जावून त्याने ४५ कप चहा परातीत ओतला आणि सचिन ने नऊ मिनिटात संपूर्ण चहा आपल्या घशाखाली उतरवला आणि पैज जिंकली. सचिनच्या या पैजेच्या चहाची चर्चा सध्या या भागात रंगली आहे.

भिगवण स्टेशन तालुका इंदापूर येथील रहिवासी आहे. सचिनची स्वतःची प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा आहे. भिगवण- खडकी मार्गावर प्रवासी वाहतूक करतो.

पहा विडिओ-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here