Breast Cancer In Men – पुरुषांनाही होतो ‘ब्रेस्ट कॅन्सर’; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय

Breast Cancer In Men
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Breast Cancer In Men) वयाच्या चाळिशीनंतर मानवी शरीरात बरेच बदल होत असतात. यातील काही बदल हे डोळ्यांना दिसणारे तर काही बदलांपासून आपण अनभिज्ञ असतो. यातील बरेच हे गंभीर आजराचे संकेत असतात आणि ते वेळीच गांभीर्याने न घेतल्यामुळे भविष्यात मोठे त्रासदायी ठरतात. अशाच एका गंभीर आजराविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

आपल्याकडे एक सर्वसामान्य गैरसमज आहे तो असा कि, फक्त स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. कारण त्यांना स्तन नसतात. मुळात स्तन हा मानवी शरीरातील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही स्तन असतात. इतकंच नाही तर तर दोघांनाही ब्रेस्ट टिश्यूज असतात. त्यामुळे बऱ्याच पुरुषांच्या संख्येमागे एका पुरुषाला ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer In Men) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चला तर जाणून घेऊयात पुरुषांच्या ब्रेस्ट कॅन्सरविषयी अधिक माहिती. यामध्ये आपण कारणे आणि उपाय पाहूया.

महिलांमध्ये हार्मोनल चेंजमुळे स्तनांना आकार प्राप्त होतो आणि ते मोठे दिसू लागतात. मात्र पुरुषांच्या बाबतीत याउलट असते. पुरुषांमद्ये हार्मोनल प्रभाव कमी असल्याने त्यांची छाती सपाट राहते. यामुळे पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षण समजून घेताना स्तनांचा बदललेला आकार महत्वाची भूमिका निभावतो. (Breast Cancer In Men) एका वृत्तानुसार, महिलांमध्ये या कर्करोगाने मृत्यू जाण्याचे प्रमाण ८३ तर पुरुषांमध्ये ७३ टक्के आहे. मात्र पुरुषांकडून या आजराच्या लक्षणांकडे विशेष दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळे उपचारांना वेळ लागतो. अशा प्रकरणांमध्ये पुरुषांनाही मोठा धोका संभवतो.

पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणे कोणती? (Breast Cancer In Men)

1) वाढते वय – वाढ्त्या वयात आरोग्याच्या अनेक समस्या त्रास देतात. त्यामुळे उतार वयात सतत शारीरिक तपासणी गरजेची असते. पुरुषांचे वय जसजसे वाढू लागते तसतशी त्यांना कर्करोग होण्याची शक्यता वाढते. रिपोर्टनुसार, ६० पेक्षा जास्त किंवा ६८ वयोवर्षाच्या जवळपास असलेल्या पुरुषांमध्ये हा ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणे जास्त प्रमाणात आढळली आहेत.

2) अनुवंशिकता – अनेक आजार अनुवांशिकरित्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा देखील समावेश आहे. एखाद्या पुरुषाच्या नात्यातील कोणत्याही महिलेला ब्रेस्ट कॅन्सर झालेला असेल तर त्या पुरुषालासुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते.

3) इस्ट्रोजन हार्मोन – इस्ट्रोजन हार्मोनचे वाढते प्रमाण हे ब्रेस्ट कॅन्सरचे मुख्य कारण ठरू शकते. इस्ट्रोजन वाढवणाऱ्या पदार्थांचे किंवा औषधांचे अति सेवन केल्यास ते पुरुषांच्या शरीरातील जीन्स सक्रिय करतात आणि यामुळे बेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

4) मद्यपान – एखाद्या पुरुषाला नियमित मद्यपानाची सवय असेल तर अशा अति प्रमाणात केलेल्या मद्यपानाचा थेट लिव्हरवर परिणाम होतो. ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

5) रेडिएशन – एखादा पुरुष आपल्या छातीवर लिंफोमासारखे कोणतेही रेडिएशन उपचार घेत असेल तरीही त्याला बेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आहे. (Breast Cancer In Men)

पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे कसे ओळखाल?

1) स्तनांचा आकार बदलणे – एखाद्या पुरुषाच्या छातीचा वा स्तनाचा आकार बदलत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याने त्वरित तपासणी करावी. कारण सुरुवातीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे लक्षण लगेच समजून येत नाही. मात्र स्तनांच्या आकारातील परिवर्तन हे मोठे लक्षण ठरू शकते. (Breast Cancer In Men)

2) स्तनांमध्ये वेदना – ब्रेस्ट कॅन्सरची गाठ हि लगेच दिसून येत नाही. मात्र स्तनांमध्ये होणारी वेदना ब्रेस्ट कॅन्सरची नांदी असूच शकते.

3) निपल्सचा बदललेला रंग – पुरुषांमध्ये स्टॅन उती विरळ असल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा फैलाव त्यांच्या शरीरात वेगाने होतो. अशावेळी निपल्सचा रंग बदलल्याचे लक्षात आल्यास वेळीच तपासणी करून घ्यावी.

उपचार काय?

ब्रेस्ट कॅन्सरवर प्राथमिक उपचार म्हणून मास्टेकटॉमी हि वैद्यकीय प्रक्रिया केली जाते. ही स्तनांच्या उतीमधील कॅन्सर झालेला हिस्सा हटवण्याची प्रक्रिया आहे. यानंतर पुरुषांमध्ये इस्ट्रोजनचे असंतुलन रोखण्यासाठी हार्मोन उपचार सुरू केले जातात. तर काही प्रकरणांमध्ये केमोथेरपी सुद्धा करावी लागते. (Breast Cancer In Men) त्यामुळे पुरुषांनो, आपल्या स्तनांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही प्रकारची शंका आल्यास त्वरित तपासणी करून घ्या आणि समस्या आढळ्यास वेळीच उपचार घ्या.