कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
कराड येथील तहसीलदार कार्यालयातील ‘तो’ अधिकारी कोण असा सवाल तालुक्यातील सामान्य लोकांच्यातून उपस्थित केला जावू लागला आहे. सोमवारी (दि.31) काल लाचलुचपतच्या सांगली कार्यालयाने खासगी कर्मचाऱ्याने 50 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु ही लाच संबधित अधिकाऱ्यासाठी केली असल्याचे म्हटले आहे. तेव्हा ‘तो’ संबधित अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
कराड येथील प्रशासकीय कार्यालयात वारंवारं चिरीमिरी घेतल्याशिवाय कामे होत नसल्याचे बोलले जात होते. खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांना साध्या दाखल्यासाठी चाैथ्या मजल्यावर जावे लागते, तेथे ठरलेले एजंट उभे असतात. सामान्यांच्या सेवा करण्याऐवजी सावज शोधण्यात प्रशासकीय कार्यालया बाहेर ठरलेले चेहरे उभे असतात. तेव्हा येथील काम वेळेत करून घ्यायचे असेल तर खिसा भरूनच यायचे हे आता खेड्यातील काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांलाही माहिती झाले आहे. अन्यथा ज्या पध्दतीने कोर्टात पुढच्या तारखा दिल्या जातात, तशाच तारखा दाखल्यासाठी दिल्या जातात. तेव्हा प्रशासकीय कार्यालयातील तहसीलदार, सेतू कार्यालयावर नियंत्रण कोणी ठेवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सेतू कार्यालय किंवा क्लार्क, पुरवठा विभाग याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी असतात. परंतु कालच्या लाच प्रकरणात सापडला खासगी इसम असता तरी तो संबधित अधिकाऱ्यासाठी काम करत होता. अशावेळी कुंपनच शेत खातयं अशी परिस्थिती कराड तहसीलदार अन् प्रशासकीय इमारतीतील आहे. सापडला तो चोर या म्हणीप्रमाणे आता केवळ खासगी इसमावर कारवाई होईल. परंतु तो अधिकारी मोकाट सुटेल अन् पुन्हा तोच प्रकार काही दिवसांनी सुरू होईल. तेव्हा या अधिकाऱ्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. तसेच या कार्यालयातील अनेक न सापडलेले चोर यांच्यावरही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा एक सापडला तरी सामान्यांना लुबड्यासाठी बाकीचे आहेतच, अशी स्थिती बदलणार नाही.
तहसील कार्यालयात खासगी इमाबाबतची हकीकत अशी आहे, की 33 वर्षीय तक्रारदार यांचे भाचीचा कुणबी असल्याचा दाखल्याचे काम संबधीत अधिकारी यांचेकडुन करुन देतो असे सांगुन तक्रारदार यांचेकडे 50,000 रु. लाच मागणी केली. तेव्हा ‘तो’ संबधित अधिकारी कोण हेही शोधणे गरजेचे आहे.