नवरदेवाला ‘तो’ हट्ट पडला महागात; लोकांनी लग्नमंडपातच लाथा-बुक्क्यांनी केली धुलाई

marraige
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमधील गाझियाबादच्या साहिबाबाद परिसरात एका नवरदेवाची लग्नातील वऱ्हाडीनी चांगलीच धुलाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या माणसांनी नवरदेवाची का धुलाई केली हे ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. जवळपास दीड मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये नवरीच्या घरचे नवरदेवाला ओढून त्याला मारहाण करताना दिसत आहेत. नवरदेवाचे नातेवाईक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या काही वेळ आधीच नवरदेवाच्या वडिलांनी हुंडा म्हणून दहा लाख रुपये कॅशची मागणी केली. नवरदेवाच्या वडिलांनी म्हटलं की पैसे मिळाले नाहीत तर हे लग्न होणार नाही. लग्नाआधीच नवरीच्या कुटुंबीयांनी तीन लाख रोख आणि एक लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी नवरदेवाला दिली होती. मात्र नवरदेवाकडच्या लोकांना आणखी हुंडा हवा होता. नवरीकडच्या लोकांनी भरपूर विनंती करूनही त्यांनी काहीच ऐकलं नाही.

यानंतर काही वेळाने नवरदेवाची सगळ्यांसमोर पोलखोल झाली. यामध्ये आरोपी नवरदेवाचं नाव मुज्जमिल असं असून तो आग्रा येथील रहिवासी आहे. तसेच या नवरदेवाची आधीच २-३ लग्न झालेली आहेत अशी माहिती नवरीच्या कुटुंबीयांनी दिली आहे. सध्या लग्नातच हुंड्याची मागणी करणाऱ्या आणि आधीपासूनच विवाहित असूनही मुलीकडच्यांची फसवणूक करणाऱ्या या नवरदेवाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.