कामचुकार कर्मचाऱ्यांना तंबी ! कार्यालयात डबा घेऊन या, नाहीतर इस्कॉनची खिचडी खा

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वसुली कर्मचाऱ्यांना ठरावीक मालमत्तांची यादी देण्यात आली आहे. पण हे कर्मचारी प्रत्यक्षात घरोघरी जाऊन वसुली करतात का? कार्यालयात वेळेवर येतात का? याची तपासणी कर मूल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी सुरू केली आहे. दोन दिवसांच्या पाहणीत दोन प्रभागात तब्बल 52 कर्मचारी गैरहजर आढळून आले. त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जात आहेत. दरम्यान अनेक जण दुपारच्या जेवणासाठी गायब होत असल्याने आता कार्यालयात येताना डबे घेऊन या, अन्यथा इस्कॉनची खिचडी पाठविली जाईल, असा इशारा या कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी यंदा मालमत्ता कराचे 468 कोटी 54 लाख तर पाणीपट्टीचे 108 कोटी 57 लाख रुपये एवढे वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार प्रशासन कामाला लागले आहे. थकबाकीदार व्यावसायिक मालमत्तांना सील लावण्याची कारवाई सध्या सुरू आहे. त्यासोबत कर मूल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येक प्रभाग कार्यालयात जाऊन वसुली कर्मचाऱ्यांची हजेरी घेत आहेत.

त्यांच्या पाहणीत अनेक कर्मचारी गैरहजर आढळून येत आहेत. मंगळवारी त्यांनी प्रभाग एकमध्ये जाऊन पाहणी केली असता 44 पैकी 32 कर्मचारी गैरहजर होते. त्यांना चौकशी केली असता, कोणी फिल्डवर आहे तर कोणी जेवणासाठी आत्ताच घरी आलो आहे, अशी कारणे दिली. त्यामुळे थेटे यांनी प्रत्येकाने कार्यालयात येताना डबा घेऊन यावा, अन्यथा इस्कॉनची खिचडी पाठविली जाईल, असा इशारा कर्मचाऱ्यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here