विशेष प्रतिनिधी। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ ब्रिटन एक नाणं काढणार आहे. ब्रिटनचे मुख्य अर्थमंत्री साजिद जाविद यांनी ही माहिती दिली आहे. मूळ पाकिस्तानी वंशाचे असलेल्या ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी ब्रिटनच्या रॉयल मिंटला याबाबत आदेश दिले आहेत. महात्मा गांधींचे विचार कधीही विसरले जाऊ नयेत यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात काही पुरस्कारांचे वाटप करण्यात आले, यावेळी जाविद बोलत होते. ते म्हणाले, “गांधींच्या स्मरनार्थ ब्रिटन एक नाणं प्रकाशित करणार आहे हे सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. गांधींनी जगाला जो संदेश दिला तो आपण कधीही विसरू शकत नाही. सत्ता ही केवळ संपत्तीतून किंवा उच्च पदामुळे मिळत नाही. जेव्हा गांधी ब्रिटनमध्ये होते तेव्हा त्यांच्याकडून आपल्या पालकांनी त्यांची मुल्यं आत्मसात केली. ती मुल्य आजही आपण जपली आहेत.”
नुकतीच २ ऑक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधींची १५० वी जयंती भारतासह जगभरात उत्साहात साजरी करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील राजकारणात महात्मा गांधी ही व्यक्ती नेहमीच अग्रभागी राहिली. त्यांच्या सत्याग्रह आणि अहिंसा या तत्वांचा जगात गौरव केला जातो. ब्रिटनमध्ये वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या आणि नंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या महात्मा गांधींचे तिथे एक विशेष आदराचे स्थान आहे.
इतर काही बातम्या-
मोदींनी ममल्लापुरम समुद्रकिनारी स्वच्छता करत दिला स्वच्छतेचा संदेश
वाचा सविस्तर – https://t.co/lviy6CCdyQ@PMOIndia @narendramodi_in @narendramodi @Dev_Fadnavis @BJP4India @swachhbharat #SwachhBharat #ModixijinpingMeet
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2019
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी ‘फोर्ब्स’कडून प्रसिद्ध, मुकेश अंबानी पुन्हा अव्वल स्थानी
वाचा सविस्तर – https://t.co/F1FpO3LxUt@AmbaniTina @RelainceSupport @reliancejio @reliancegroup @reliancetrends @RelianceEnt @Forbes @ForbesTech #MukeshAmbani #MumbaiIndians
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2019
राणे पिता पुत्रांसाठी मुख्यमंत्री कणकवलीत; शिवसेनेचा विरोध
वाचा सविस्तर – https://t.co/LtzEvJH5qy@NiteshNRane @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #vidhansabha2019#MaharashtraAssemblyPolls
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2019