ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ICUमधून आले बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होत. दरम्यान, त्यांना आता अतिदक्षता विभागाबाहेर आणण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अशी माहिती रुग्णालयानं दिली आहे. पंतप्रधान जॉन्सन यांना आयसीयूमधून बाहेर आले असले तरी त्यांना रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली आहे. ब्रिटनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण तेथील नागरिकांना झाली आहे. करोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये आतापर्यंत ८ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनचे पंतप्रधान सुद्धा कोरोनाच्या कचाट्यात सापडले होते. दरम्यान, त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा वाटल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी आयसीयूमधून हलवलं आहे. मात्र, खबरदारी म्ह्णून त्यांना अजून काही दिवस रुग्णालयात उपचार घ्यावा लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment