मास्कसह सर्व निर्बंध हटवण्याचा ब्रिटनचा निर्णय आत्मघातकी ठरेल- शिवसेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरात कोरोना विषाणूचा कहर काही प्रमाणात कमी आला असला तरी अद्याप कोरोनावर कोणताही देश पूर्णपणे मात करू शकला नाही. त्यातच आता कोरोनाचे डेल्टा प्लस, लॅमडा, असे अनेक उपप्रकार निर्माण झाले असून हे विषाणू अधिकच धोकादायक आहेत. दरम्यान ब्रिटन मध्ये मात्र अशा परिस्थितीत देखील तेथील निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत आणि मास्क, सोशल डिस्टन्स हे निर्बंध देखील हटवले असून ब्रिटनचा हा निर्णय जगासाठी आत्मघाती ठरेल असा दावा शिवसेनेने आपल्या सांमना अग्रलेखातुन केला आहे.

रुग्णांची संख्याही ब्रिटनमध्ये वाढते आहे. अशा स्थितीतही पंतप्रधान जॉन्सन यांनी 19 जुलैपासून देशातील सर्व निबंध हटवण्याचा निश्चय केला आहे. ब्रिटनचा हा निर्णय धाडसी असला तरी तो आत्मघातकी ठरू शकतो. पुन्हा हा आत्मघात केवळ ब्रिटनपुरताच मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण जगासाठी हे धाडस धोकादायक ठरू शकते. चीनच्या एका शहरातून बाहेर पडलेला हा विषाणू हा हा म्हणता सातासमुद्रापलीकडे पोहचला संपूर्ण जगच या विषाणूने व्यापून टाकले. कोटयवधी लोकाना त्याची लागण झाली. 40 लाखाहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. ही सगळी भयंकर स्थिती डोळ्यासमोर असताना कोरोनाला रोखण्यासाठी निर्धारित करण्यात आलेले सर्व निर्बंध रद्द करून जनतेला मुक्त संचाराची मोकळीक देणे ही केवळ ब्रिटनसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरू शकते असे शिवसेनेने म्हंटल आहे.

सततच्या लॉक डाऊनमुळे गेल्या दीड दोन वर्षात जगभरातील देशाची अर्थव्यवस्था उदध्वस्त झाली, व्यापार उद्योग बुडाले, बेरोजगारी वाढली यातून मार्ग काढण्यासाठी जगरहाटी सुरू करणे आवश्यक आहे हे खरेच. पण त्यासोबत मास्क आणि सोशल डिस्टसिगचे निर्बंध संपूर्ण हटवणे हा जिवाशी खेळ ठरू शकतो. तरीही कोरोनामुळे सवा लाखाहून अधिक बळी गेलेल्या ब्रिटनने हा निर्णय घेतला

कोरोनासोबत जगायला शिका असा संदेश देऊन ब्रिटनच्या पंतप्रधानांनी संपूर्ण निर्बंध हटवण्याची घोषणा केली असली तरी कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यात यशस्वी ठरलेल्या न्यूझिलंडसारख्या देशाने मात्र या भूमिकेला विरोध केला आहे. कोरोनामुळे न्यूझिलडमध्ये केवळ 26 नागरिकांचा मृत्यू झाला आहे न्यूड सरकारने निबंधाची काटेकोर अमलबजावणी केल्यामुळेच तिथे कोरानाचा उद्रेक झाला नाही त्यामुळेच काशनासोबत जगा है ब्रिटनचे धोरण आम्ही स्वीकारणार नाही आणि निर्बंध हटणार नाही, असे न्यूझिलच्या प्रधान सिहा आन यांनी स्पष्ट केले आहे.

अचानक एक उठून आजपासून आधी होती ती जीवनशैली सुरू करण्याची घोषणा करता येणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे. एकीकडे कोसेनाचा नवीन डेल्टा व्हेरिएंट जगभरात धुमाकूळ घालतो आहे. त्यापाठोपाठ ‘लॅमडा’ नावाचा नवीन कोरोना विषाणू दक्षिण अमेरिकेत आढळला आहे. कोरोनाचा मूळ विषाणू आणि डेल्टा व्हेरिएटपेक्षाही ‘लॅमडा हा व्हेरिएट अधिक प्राणघातक आहे. ब्रिटनमध्येही त्याचे काही रुग्ण आढळले आहेत. असे असतानाही मास्कसह सर्व निर्बंध हटवण्याचा ब्रिटनचा निर्णय आत्मघातकी ठरू शकतो असेही शिवसेनेने म्हंटल.

Leave a Comment