British Beer : तळीरामांसाठी खुशखबर!! Beer- स्कॉच स्वस्त होणार; 75% किमती घसरणार

British Beer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन British Beer भारतात दारू पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही…. बिअर पासून ते वाईन, स्कॉच पिणारे लाखो करोडो लोक आहेत. अगदी कॉलेजच्या तरुणांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत अनेकजण मनसोक्त दारूचा आनंद घेत असतात. दारू हि शरीराला हानिकारक आहे हे माहित असूनही दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असते. आता या तळीरामांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात ब्रिटिश बिअर ब्रँड आणि स्कॉच अगदी स्वस्तात मिळणार असून त्याच्या किमती तब्बल ७५% पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे ब्रिटनमध्ये बनवल्या जाणाऱ्या बिअरवरील १५० टक्क्यांपर्यंतचा टॅक्स आता ७५% करण्यात आला आहे. त्यामुळे बिअर आणि स्कॉच च्या किमतीही ७५% ने स्वस्त होणार आहेत.

भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार- British Beer

आतापर्यंत भारतात ब्रिटिश बिअरवर १५० टक्क्यांपर्यंत कर होता, परंतु आता एफटीए कराराअंतर्गत हा कर ७५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या कर कपातीचा थेट फायदा बिअर प्रेमींना होईल. भारत आणि ब्रिटनमधील हा मुक्त व्यापार करार ६ मे रोजी पूर्ण झाला. या कराराअंतर्गत, भारताने UK वाईनवर कोणतीही शुल्क सवलत दिलेली नाही, तर बिअरवर मर्यादित आयात शुल्क लाभ देण्यात आले आहेत. . दोन्ही देशाच्या या करारामुळे तळीरामांना मोठा फायदा झाला आहे. कारण आता उच्च प्रतीची ब्रिटिश बिअर (British Beer) अधिक परवडणाऱ्या दरात त्यांना मिळणार आहे.

या करारामुळं फक्त बिअरच नव्हे तर इतर काही ब्रिटिश उत्पादनांवरील शुल्कदेखील कमी होणार आहे. ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत अधिक आंतरराष्ट्रीय पर्याय उपलब्ध होतील. दुसरीकडे, ज्या संवेदनशील कृषी उत्पादनांवर भारत कोणताही आयात शुल्क कमी करणार नाही त्यात दुग्धजन्य पदार्थ, सफरचंद, चीज, ओट्स, प्राणी आणि वनस्पती तेल यांचा समावेश आहे.

एकीकडे बिअर वरील टॅक्स कमी करण्यात आला असला तरी दुसरीकडे वाईन वरील कर मात्र कायम आहे. यामागे सुद्धा मोठं राजकारण दडलंय. युरोपीय संघ वाइन क्षेत्रात एक मोठा आणि महत्त्वाचा जागतिक उत्पादक आहे. जर ब्रिटनला वाइनवर आयात शुल्क सवलत दिली गेली असती, तर युरोपीय संघाकडूनही त्यांच्या वाइनवर शुल्क कपातीसाठी भारतावर दबाव वाढू शकला असता. त्यामुळे, वाइनला या सवलतीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.