हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पिंपरी शहरातील मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्बनाशक पथक शोध घेत आहे.
आज सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान पिंपरी मधील कोहिनूर सोसायटीच्या आवारात खोदकाम सुरू असताना जेसीबी चालकाला हा बॉम्ब आढळून आला. यानंतर याची माहिती मिळताच पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ त्या ठिकाणी आपल्या टीम सोबत पोहचले. तोपर्यंत पुण्याहून बॉम्बनाशक पथक निघाले होते. हे पथक येतातच ज्या ठिकाणी बाँब आढळून आला त्या ठिकाणी पाहणी करत तो बाँब सील करून तपासणी साठी घेऊन गेले आहेत.
बाँब नाशक पथकाने पाहणी केल्यानंतर जेसीबीच्या बकेटमध्ये वाळूची पोती टाकून त्यात बॉम्ब सदृश वस्तू ठेऊन पुढील तपासणीसाठी नेण्यात आला आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारचे ब्रिटिशकालीन बॉम्ब पिंपरी परिसरात सापडले आहेत. हे बॉम्ब अनेक वर्षांपासून जमिनीवर पडलेले असून ते खोदकामाच्या वेळी आढळून येत आहेत.




