बंधूप्रेम : कृष्णा नदीत चार भावंडे बुडाले, एकाला वाचविण्यासाठी तिघांची पोहता येत नसताना पाण्यात उडी

बेळगांव | धुणे धुण्यासाठी नदीवर गेलेले चौघे भावंडे कृष्णा नदीत बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. नदीवर धुणे धुवत असताना मधला भाऊ तोल जाऊन नदीच्या पाण्यात बुडू लागल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पोहायला येत नसताना तीन भावांनी नदीत उडी घेतली, यामध्ये चौघेही बुडाले. पोहायला येत नसतानाही भावाला वाचवण्यासाठी नदीत उडी तीन्हीं भावडांनी उडी घेतल्याने बंधूप्रेम पहायला मिळाले. मात्र चाैघेही बुडाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अथणी तालुक्यातील हल्याळ गावात गुरुवारी उरुस असल्याने त्यानिमित्त ग्रामस्थ घरातील कपडे आणि बिछाने धुण्यास जात आहेत. कृष्णा नदीवर अंथरुण धूत असताना चार भावंडापैकी मधला भाऊ सदाशिव बनसोडे (वय -24) याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी मोठे भाऊ परशराम यांनी नदीत उडी घेतली, पण तेही बुडाले. त्या दोघांना वाचवण्यासाठी दयाप्पा बनसोडे (वय- 22) याने नदीत उडी घेऊन दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण तोही बुडाला. त्यानंतर कनिष्ठ भाऊ शंकर बनसोडे (वय- 18) यानेही नदीत उडी घेतली. पण त्यालाही पोहता येत नव्हते. त्यामुळे तोही बुडाला. परिणामी बुडालेले चौघेही भाऊ घटनास्थळापासून लांब वाहत गेले असण्याची शक्यता आहे.

घटनेची माहिती बनसोडे कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती अथणी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी डीवायएसपी एस. व्ही. गिरीश, सीपीआय शंकरगौडा बसगौडर, पीएसआय कुमार हडकर, तहसीलदार दुंडाप्पा कोमर यांनी धाव घेतली. नदीकाठी तालुका प्रशासन ठाण मांडून आहे. वाहून गेलेल्यांपैकी दोघे विवाहित आहेत. दोघे अविवाहित आहेत. त्यांच्या मागे आई-वडील, दोन भावांच्या पत्नी, तीन मुले, तीन मुली आहेत. ऐन सणात ही दुर्घटना घडली