भावडांचे धाडस : बिबट्याचा अंधारात थरारक पाठलाग करून दोन कुत्र्यांना दिले जीवनदान

0
41
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील निवी गावात बिबट्या आपल्या पाळीव कुत्र्यांना फरफटत नेत असल्याचे दोन भावडांनी पाहिले. काही क्षणातच या भावडांनी बिबट्याच्या तोडातून पाठलाग करत कुत्र्यांना जीवनदान दिले आहे. सदरची थरारक घटना रात्री 9 च्या सुमारास अंधारात घडताना केवळ बॅटरीच्या उजेडावर भावडांनी बिबट्याला पिटाळून लावले. मनोज व शैलेश गणपत माने अशी या धाडसी भावडांची नावे आहेत.

निवी या दुर्गम भागात घराच्या समोरूनच दोन पाळीव कुत्र्यांना फरफटत घेऊन बिबट्या निघालेला होता. यावेळी या दोन्ही भावडांच्या हातात केवळ बॅटरी होती, त्यांनी अंधारात बॅटरीच्या उजेडाने पाठलाग करत दोन्ही कुत्र्यांचे प्राण वाचविले. या वेळी क्षणाचाही विलंब न लावता हातात काठ्या व बॅटऱ्या घेऊन मनोज माने (वय- 30) व शैलेश माने (वय 18) यांनी बिबट्याचा पाठलाग सुरू केला.

काल रात्री नऊच्या सुमारास निवीतील गणपत महातू माने यांच्या घरातील लोक जेवत असतानाच अचानक बाहेर त्यांच्या पाळीव कुत्र्यांचा आरडाओरडा कानावर आला. तेव्हा जेवणाच्या ताटावरून उठून सर्व जण बॅटऱ्या घेऊन बाहेर पळाले. त्या वेळी तीनपैकी दोन कुत्र्यांना फरफटत घेऊन निघालेला बिबट्या त्यांना दिसला.

या वेळी क्षणाचाही विलंब न लावता हातात काठ्या व बॅटऱ्या घेऊन दोन्ही भावडांनी बिबट्याचा पाठलाग सुरू केला. त्या वेळी एक कुत्रे बिबट्याच्या तोंडातून खाली पडले. त्यानंतर काही अंतरावर त्यांनी बिबट्याला गाठून दुसऱ्या कुत्र्याचीही सुटका केली. दोन्ही कुत्री प्रचंड भेदरलेली होती, त्यांच्या गळ्याला जखम झाल्याने रात्री प्रथोमोपचार करण्यात आले. सकाळी त्या परिसरात चिखलात पंजाचे ठसे उमटल्याचे निदर्शनास आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here