स्पर्धापरीक्षेसाठी आलेल्या तरुणाची हात छाटून निर्घृण हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | बँकेची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादेत आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाची भोसकून व निर्घृणपणे हात छाटून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मनपा मुख्यालय जवळील मुस्लिम कब्रस्तान मध्ये घडली. विशेष म्हणजे आज त्या तरुणाची परीक्षा होती. रात्रीची संचारबंदी सुरू असताना संचारबंदीत अशा प्रकारे निर्घृण हत्येची घटना समोर आल्याने पोलिसांच्या रात्र गस्तीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विकास देवीचंद चव्हाण वय- 23, (रा.पाथर्डी, जि. अहमदनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार असल्याने आज सकाळी काही नागरिक कब्रस्तानमध्ये आले असता. तेथे रक्ताच्या थारोळ्यात तरुण जमिनीवर पडलेला दिसला. नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली, माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, साह्ययक आयुक्त हनुमंत भापकर, गुन्हेशाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरक्षक संभाजी पवार,श्वान पथक, फॉरेन्सिक टीमने घटनस्थळ गाठले. यावेळी मृतदेहाची पाहणी केली असता, संपूर्ण शरीर रक्ताने माखलेला होता. शरीरावर भोसकल्याच्या जखमा आढळून आल्या, तर मृतदेहाचा एक हात कोणी पासून छाटलेला होता. तो छाटलेला हात आढळून आलेला नाही. ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी कब्रस्तानची पाहणी केली असता.

कब्रस्तानच्या दुसऱ्या दरवाज्याजवळ श्वानाला एक बॅग आढळून आली. त्यामध्ये परीक्षेचा हॉल तिकीट, ओळखपत्र अशी कागदपत्रे आढळून आली. त्या आधारे पोलिसांनी पाथर्डी गावातील काही नागरिकांशी संपर्क केला असता मृतदेह विकासचा असल्याचा निष्पन्न झाले आहे. विकासची हत्या कोणी व का केली, ही हत्या चोरी, लूटमारच्या उद्देशाने झाली किंवा यामागे काही वेगळे कारण आहे. खूनाचे कारण दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou