बीएसएफने सीमेलगत पाकिस्तानचे हेरगिरी करणारे ड्रोन पाडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर । जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पडले. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा कुरापती काढण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येत होता. जम्मू-काश्मीरच्या सीमेवर हे ड्रोन गोळाबार करुन पाडण्यात यश आले आहे. रथुआ गावात फॉरवर्ड पोस्टमध्ये ड्रोन पाडण्यात यश आले.

बीएसएफची १९ बटालियन हिरानगर सेक्टरमध्ये गस्त घालीत होती. यावेळी शनिवारी पहाटे ५.१० वाजता बीएसएफच्या सीमा चौकीच्या पानसरजवळ एक पाकिस्तानी गुप्तचर ड्रोन उडताना दिसले. ड्रोनचा मागोवा घेतल्यानंतर उपनिरीक्षक देवेंदरसिंह यांनी त्यावर नऊ एमएम बॅरेटच्या आठ राउंड गोळ्या झाडल्या.

हिरानगर सेक्टरमधील रथुआ भागात सीमा चौकी पानसरजवळ हे ड्रोन खाली पाडले. हे ड्रोन पाडले त्याठिकाणापासून पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून हे अंतर अंदाजे २५० मीटर होते. हे ड्रोन पाडल्याची प्राथमिक माहिती असून अधिक तपशील मिळण्यास उशीर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”