हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : कोरोना काळापासून अनेक कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे. अशावेळी कामासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. जर आपणही घरातून काम करत असाल आणि अचानक इंटरनेट डेटा संपल्यानंतर वेगळा डेटा व्हाउचर ने रिचार्ज करत असाल तर आता आपल्याला काळजी करण्याचे काही कारण नाही. वास्तविक, BSNL कडे असे अनेक डेटा व्हाउचर आहेत ज्यामध्ये डेली भरपूर डेटा दिला जातो आहे. बीएसएनएलच्या या बेसिक प्लॅनच्या किंमती 16 रुपयांपासून ते 1515 रुपयांपर्यंत आहे. चला तर मग या डेटा पालन विषयीची माहिती जाणून घेउयात…
BSNL चा 97 रुपयांचा डेटा प्लॅन
या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना डेली 2GB डेटा मिळेल, ज्याची व्हॅलिडिटी 15 दिवसांची असेल. तसेच यामधील डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 40kbps होईल. यासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि हॅलो ट्यूनचा एक्सेस देखील मिळेल.
BSNL चा 98 रुपयांचा डेटा प्लॅन
या प्लॅनमध्ये देखील ग्राहकांना डेली 2GB डेटा मिळेल, ज्याची व्हॅलिडिटी 22 दिवसांची असेल. तसेच यामधील डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 40kbps होईल. यासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि हॅलो ट्यूनचा एक्सेस देखील मिळेल. तसेच या आधीच्या प्लॅनच्या तुलनेत यामध्ये एक रुपया जास्त देऊन 7 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी देखील मिळेल.
BSNL चा 198 रुपयांचा डेटा प्लॅन
या प्लॅनमध्ये देखील ग्राहकांना डेली 2GB डेटा मिळेल, ज्याची व्हॅलिडिटी 40 दिवसांची असेल. तसेच यामध्ये देखील इतर प्लॅन प्रमाणेच डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 40kbps होईल. यासोबतच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, हॅलो ट्यून आणि चॅलेंज एरिना मोबाईल गेमिंग सर्व्हिसेसचा एक्सेस देखील मिळेल.
BSNL चा 1515 रुपयांचा डेटा प्लॅन
बीएसएनएलचा हा एक नवीन रिचार्ज पॅक आहे. ज्यामध्ये 365 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत डेली 2GB डेटा मिळेल. तसेच यामध्ये देखील इतर प्लॅन प्रमाणेच डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 40kbps होईल. मात्र, या प्लॅनमध्ये कोणतेही अतिरिक्त बेनिफिट देण्यात आलेले नाही.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do
हे पण वाचा :
Jandhan Account : जनधन खातेधारकांना झिरो बॅलन्सवरही मिळेल 10,000 रुपयांचा लाभ, कसे ते जाणून घ्या
New Business Idea : फर्निचरच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Jio च्या ‘या’ नवीन प्लॅनमध्ये 252 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळणार डेली 2.5GB डेटा
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Travel Insurance : रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवले किंवा चोरीला गेल्यावरही करता येतो क्लेम, जाणून घ्या त्याविषयीचे नियम