हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार चढाओढ सुरु आहे. त्यासाठी या कंपन्यांकडून ग्राहकांसाठी अनेक नवनवीन प्लॅन ऑफर केले जातात. याचा फायदा ग्राहकांनाच होत असून त्यांना कमी खर्चात जास्त फायदे मिळतील. अशातच सरकारी कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक कमी कमिटीचा प्लॅन ऑफर केला आहे. जर तुम्हांलाही कमी पैशांत जास्त फायदा असलेला प्लॅन हवा असेल तर बीएसएनएलच्या प्लॅन्स विषयी जाणून घ्या …
सर्वांत आधी बीएसएनएलच्या 20 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनबाबत माहिती घेउयात. हे लक्षात घ्या कि, बीएसएनएलकडून ग्राहकांना 19 रुपयांचा प्लॅनची ऑफर दिली जाते, ज्यामध्ये ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात. BSNL च्या या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊया.
BSNL चा 19 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच, रिचार्ज केल्याने कॉल दर 20 पैशांपर्यंत खाली येतो. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर फोन महिनाभर चालू शकेल. यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
जर तुम्हाला कमी पैशात जास्त व्हॅलिडिटी आणि व्हॉईस कॉलिंग असलेला प्लॅन हवा असेल तर बीएसएनएलच्या या 19 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करू शकता.
BSNL चा 50 रुपयांचा प्लॅन
BSNL च्या या प्लॅनची किंमत 50 रुपयांपेक्षा कमी आहे. जर तुम्हाला कमी पैशात जास्त व्हॅलिडिटी आणि व्हॉईस कॉलिंग असलेला प्लॅन हवा असेल तर बीएसएनएलकडे 50 रुपयांचा आणखी एक प्लॅन आहे. बीएसएनएलचा हा 49 रुपयांचा प्लॅन देखील एक चांगला पर्याय ठरू शकेल.
या प्लॅनमध्ये 20 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच ग्राहकांना 100 मिनिटे व्हॉइस कॉलिंग आणि 1GB डेटा देखील मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do
हे पण वाचा :
84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेले Jio चे ‘हे’ जबरदस्त प्लॅन्स !!!
Part Time Job : दररोज फक्त 1 तास काम करून दरमहा करा हजारो रुपयांची कमाई !!!
Banking Service: 1 ऑगस्टपासून बँकेशी संबंधित ‘या’ नियमात होणार बदल !!!
EPFO : ईपीएफ-पीपीएफमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या
ATM द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी SBI ने ग्राहकांना दिला ‘हा’ सल्ला !!!