ATM द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी SBI ने ग्राहकांना दिला ‘हा’ सल्ला !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : इंटरनेट बँकिंगमुळे आजकाल ऑनलाइन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहेत. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम हे आजही सर्वाधिक पसंतीचे माध्यम आहे. मात्र, एटीएमच्या अतिवापरामुळे त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या प्रकारणांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एटीएम स्किमिंग करून गुन्हेगार लोकांची फसवणूक करतात.

SBI General Insurance continues to strengthen its awareness and educational  initiatives for farmers this Rabi season - NewZNew

बँकाकडून ग्राहकांना वेळोवेळी एटीएम वापराबाबत सावधगिरी बाळगण्यासाठी सर्तक करत असतात. आता SBI ने देखील एक ट्विट करून ATM द्वारे पैसे काढताना OTP वापरण्याचा सल्ला दिला आहे. 2020 पासून SBI कडून ग्राहकांसाठी OTP सर्व्हिस देण्यात सुरूवात केली आहे. मात्र, अजूनही बरेच ग्राहक OTP आधारित एटीएम ट्रान्सझॅक्शन करत नाहीत.

SBI | JPMorgan: State Bank of India joins JPMorgan's blockchain-based  payment network

OTP सर्व्हिस वापरण्याच्या टिप्स

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून द्वारे ट्विट करत SBI ने ग्राहकांना ATM मधून पैसे काढताना OTP वापरण्याचा सल्ला दिला आहे. या ट्विटमध्ये बँकेने लिहिले की, “एसबीआय एटीएममधील ओटीपी आधारित व्यवहार हे फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एक उत्तम शस्त्र आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.” 1 जानेवारी 2020 पासून SBI बँकेने OTP सर्व्हिस सुरू केली आहे. बँकेकडून वारंवार ही माहिती शेअर केली जाते जेणेकरून ती आपल्या ग्राहकांचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करू शकेल.

SBI Customers: These Documents Need to be Updated by June-end to Avail  Services

अशा प्रकारे वापरा

SBI एटीएममधून पैसे काढण्यासाठी पहिले एटीएम मशीनमध्ये कार्ड घाला.
OTP पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल, आता तो टाका.
यानंतर एटीएम पिन टाका.
एटीएम मशिनमधून रोख रक्कम दिली जाईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.onlinesbi.com/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवीन दर पहा

Sukanya Smiriddhi Yojana द्वारे टॅक्स वाचवण्याबरोबरच मुलीच्या भविष्यासाठी जमा करा मोठा फंड !!!

FD Rates : SBI की पोस्ट ऑफिस यापैकी कोणत्या FD वर चांगला रिटर्न मिळेल ते पहा !!!

Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गाठला सर्वकालीन उच्चांक !!!

FD Rates : ‘या’ खासगी बँकेने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केले बदल !!!