हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL Recharge Plans – BSNL ने एक आकर्षक ऑफर जाहीर केली असून, हि होळीच्या सणानिमित्य देण्यात आली आहे. या ऑफेरमध्ये BSNLच्या युजर्सना जास्त कालावधीसाठी इंटरनेट, कॉलिंग सेवा आणि इतर फायदे मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला 1499 रुपये आणि 2399 रुपये मूल्याच्या प्रीपेड प्लॅनचा रिचार्ज करावा लागणार आहे. तसेच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 1 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 कालावधी देण्यात आला आहे. तर चला या ऑफरबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
BSNL चा 1499 रुपयांचा प्लॅन (BSNL Recharge Plans) –
व्हॅलिडिटी – 365 दिवस
अनलिमिटेड कॉलिंग – भारतातील कोणत्याही नेटवर्कवर
मोफत नॅशनल रोमिंग
डेटा – 24GB (दरमहा 2GB) आणि डेटा मर्यादा संपल्यानंतर 40kbps इंटरनेट स्पीड
SMS – दररोज 100 SMS
BSNL च्या 2399 प्लॅनवर ऑफर –
व्हॅलिडिटी – 425 दिवस
डेटा – दररोज 2GB (एकूण 850GB) आणि डेटा मर्यादा संपल्यानंतर स्पीड कमी होईल.
SMS – दररोज 100 SMS
अनलिमिटेड कॉलिंग – भारतातील कोणत्याही नेटवर्कवर
OTT फायदे – BiTV चे मोफत सबस्क्रिप्शन, ज्यामुळे विविध OTT अँप्सचे ऍक्सेस मिळेल.
वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही –
जर तुम्ही जास्त कालावधीचा प्लॅन शोधत असाल, तर 1499 किंवा 2399 रुपयांचे प्लॅन फायदेशीर ठरू शकतात . यामध्ये एक वर्षभर कॉलिंग, डेटा, SMS आणि OTT सेवा मिळत आहेत. त्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. वाढलेली व्हॅलिडिटी अन OTT फायदे यामुळे ही डील अधिक आकर्षक बनली आहे.