नवी दिल्ली | एक ट्रिलयन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठण्यासाठी ५५ वर्ष लागली, आम्ही फक्त पाच वर्षात त्यात एक ट्रिलियन डॉलर्सची भर टाकली आणि याच वर्षी आपली अर्थव्यवस्था तीन डॉलर्सचे लक्ष्य गाठेल असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंदाजपत्रक मांडतांना व्यक्त केला.
Finance Minister Nirmala Sitharaman: It is also proposed to increase custom duty on gold & other precious metals from 10% to 12.5%. #Budget2019 pic.twitter.com/b3aS6GHBHO
— ANI (@ANI) July 5, 2019
निर्मला सीतारामण पुढे म्हणाल्या की, पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यस्थेचे लक्ष्य आम्ही येत्या काही वर्षांमध्ये नक्की गाठू. पाच वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. आज ती जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था झाली आहे.
गेल्या पाच वर्षात नव्या भारतासाठी आम्ही काम केलं, देशातील शेवटच्या माणसापर्यंत आम्ही पोहोचलो. खासगी उद्योगांनी अर्थव्यवस्था वाढवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. आमचं सरकार परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या सूत्राने काम करते आहे. आता नव्या भारताचं स्वप्न सत्यात उतरेल असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाच्या –
अर्थसंकल्प : मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट
अर्थसंकल्प2019- महिलांसाठी काय आहे ह्या अर्थसंकल्पा मध्ये?
… या कारणामुळे केला होता स्वतंत्र ‘रेल्वे अर्थसंकल्प’ बंद!