Union Budget 2021| आरोग्य क्षेत्राला फायदा ; प्रत्येक जिल्ह्यात होणार अत्याधुनिक लॅब – अर्थमंत्री निर्मला सितारामन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटानंतर आज पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ६४१८० कोटींची घोषणा केली.

पुढील सहा वर्षात आरोग्य सेवेचा टप्याटप्यात दर्जा सुधारला जाणार आहे.प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सरकारने सहा वर्षांची योजना तयार केली आहे, असे सीतारामन यांनी आज सांगितले. त्या म्हणाल्या की नॅशनल हेल्थ मिशनला यामुळे फायदा होईल. या योजनेत ग्रामीण भारतात १७००० आणि शहरी आणि निमशहरी भागात ११००० नवीन आरोग्य सेवा केंद्र उभारली जातील.

आरोग्य सेवा केंद्र आणि लॅब यांना एकमेकांशी जोडले जाणार आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक लॅब उभारन्ह्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment