Budget 2021: प्रस्तावित मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. यंदा मोठा बदल म्हणजे बहीखात्याऐवजी मेक इन इंडियाच्या टॅब्लेटद्वारे अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यंदा अर्थसंकल्पात केंद्रानं रस्ते आणि दळणवळण सुविधांवर भर दिला आहे. केंद्रानं भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी रस्ते विकासासाठी १.१८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाची बाबा म्हणजे , मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी केंद्रानं भरगोस ६४ हजार कोटींची तरतूद केली आहे. , मुंबई-कन्याकुमारी हा महामार्ग प्रस्त प्रस्तावित ११०० किमी अंतर असलेल्या नॅशनल हायवे कॉरिडॉरचा भाग असणार आहे.  नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरकिडे तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये महामार्गांच्या कामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात येथे निवडणुका होणार आहेत. याशिवाय पश्चिम बंगालमधील महामार्गांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

दरम्यान, जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी लवकरच लागू करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १५ वर्ष जुन्या वाहनांना भंगारात काढणार असल्याचे जाहीर केलं होत. त्यानुसार आज अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी यावर शिक्कामोर्तब केला.

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रानं सडक परिवहनासाठी 1 लाख 18 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद, रेल्वेच्या पायाभूत सुविधासाठी रेल प्लान 2030 केंद्राच्या विचारात असल्याचे सीताराम यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment