Budget 2021: केंद्र जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी ‘व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी’ आणणार – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. यंदा मोठा बदल म्हणजे बहीखात्याऐवजी मेक इन इंडियाच्या टॅब्लेटद्वारे अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. देशातील उद्योजक, नोकरदार आणि सामान्य जनतेला बजेटची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी लवकरच लागू करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

काही दिवसनपूर्वीच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १५ वर्ष जुन्या वाहनांना भंगारात काढणार असल्याचे जाहीर केलं होत. त्यानुसार आज अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी यावर शिक्कामोर्तब केला.

निर्मला सीतारामन  यांनी जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ जाहीर केली आहे. २० वर्षांनी खासगी वाहनांसाठी तर व्यवसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली.

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रानं सडक परिवहनासाठी 1 लाख 18 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद, रेल्वेच्या पायाभूत सुविधासाठी रेल प्लान 2030 केंद्राच्या विचारात असल्याचे सीताराम यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like