नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (१ फेब्रुवारी) संसदेत बजेट सादर करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदी याच्या किमतीवर परिणाम करणारी मोठी घोषणा केली आहे.
निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. कस्टम ड्युटीत कपात झाल्यावर सोने आणि चांदी स्वस्त होणार आहे. तर दुसरीकडे केंद्रानं मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढून 2.5 टक्के केली आहे. याचा थेट परिणाम मोबाईलच्या किमतींवर होणार आहे. येत्या काळात मोबाईलच्या किंमतीत वाढ होणार आहे.
दरम्यान, केंद्रानं स्टील उपकरणांवरील कस्टम ड्युटी कमी करत 7.5 टक्के केली आहे. कॉपरवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 2.5 टक्क्यांवर, नायलॉनवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 5 टक्क्यांवर, सोलर इन्व्हर्टरवरील कस्टम ड्युटी 20 टक्क्यांवर, निवडक ऑटो पार्टवरील कस्टम ड्युटी वाढवून 15 टक्क्यांवर आणली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.