हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटानंतर आज पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वच देशावासियांचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर भरीव तरतूद करण्यात येणार याबरोबरच काय स्वस्त होणार आणि काय महागणार? याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आपण इथे पाहूया की काय स्वस्त आणि काय महाग होऊ शकत
हेल्मेट स्वस्त होणार?
केंद्र सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी गेल्या काही वर्षापासून मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे रस्ते अपघात टाळण्यासाठी हेल्मेटवरील जीएसटी कमी करण्यात येऊ शकते. त्यामुळे हेल्मेट स्वस्त होतील आणि त्याच्या खरेदीतही वाढ होईल. परिणामी रस्ते अपघात रोखता येणार आहेत. त्याशिवाय रस्ते अपघात अभियानावर जो पैसा खर्च केला जातो. त्यातही बचत होणार आहे.
इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होण्याची शक्यता
इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढावा म्हणून केंद्र सरकार काही नवीन घोषणा करण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देण्याची घोषणा होऊ शकते. आजच्या अर्थसंकल्पातून ही बाब स्पष्ट होईल.
घरगुती वापराच्या वस्तू महागणार??
आजच्या अर्थसंकल्पात गृहिणींना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये घरगुती वस्तू महागण्याची शक्यता आहे. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, क्लॉथ ड्रायर आदी वस्तू महागण्याची शक्यता आहे. त्या शिवाय अनेक गोष्टी महागणार असल्याने सामान्य लोकांना त्याचा फटका बसणार आहे
रेल्वे प्रवास महागणार?
मागील वर्ष हे कोरोना संकटात गेलं. देशभरातील लॉक डाउन मुळे रेल्वे सेवा बंद होती. परिणामी रेल्वेला त्याचा मोठा घाटा बसला आहे. रेल्वेचे अनेक प्रकल्प रखडले असून नव्या प्रकल्पांनाही सुरुवात करायची आहे. परंतु रेल्वेची आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने रेल्वे तिकीटात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’