हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता करदाते आपले वार्षिक रिटर्न दोन वर्षांपर्यंत अपडेट करू शकतील आणि काही चूक असल्यास त्यामध्ये बदलही करू शकतील. याद्वारे ते त्यांचा थकित करही भरू शकतील. यासाठी सरकार लवकरच नवीन आयटी रिटर्न पोर्टल जारी करणार आहे.सहकारी संस्थांवरील करही 15 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. यावरील सरचार्जही 7.5 टक्के करण्यात आला आहे.
अपंग व्यक्तीच्या पालकांसाठी इन्शुरन्सवर मिळालेल्या लंपसम वरील कर वगळण्यात आला आहे. त्यात ए न्युइटीचाही समावेश आहे. हे वयाच्या 60 वर्षापर्यंत लागू असेल.
याशिवाय, नियोक्त्याच्या सहभागावर NPS वर 14 टक्के कर सूट मिळेल, जी आतापर्यंत 10 टक्के आहे.
स्टॉक आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना धक्का
शेअर्स आणि म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून मिळणाऱ्या रिटर्न्सवरील टॅक्स दरही अर्थमंत्र्यांनी वाढवला आहे. आता गुंतवणूकदारांना लाँग टर्म कॅपिटल गेन्स (LTCG) वर 15 टक्के दराने टॅक्स भरावा लागेल. आतापर्यंत यावर 10 टक्के LTCGआकारले जात होते. याचा अर्थ असा की, जर तुम्ही एक वर्षापेक्षा जास्त काळ स्टॉक ठेवला तर तुम्हाला रिटर्नवर 15 टक्के टॅक्स भरावा लागेल. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडात तीन वर्षांहून जास्त काळ गुंतवणूक केल्यानंतर मिळालेल्या रिटर्नवरही 15 टक्के LTCG लागू होईल.