Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या काळातील हा सलग तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात एकूणच सर्वसामान्य माणसाला काय मिळेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. असे असताना यंदाच्या बजेट मध्ये शेतकरी , महिला , ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी (Budget 2024) देण्याकडे दिसत आहे.
शेतकरी, महिला, तरुण आणि गरीबांसाठी बजेट
यावेळी भाषणाच्या दरम्यान ,अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले की, ‘भारतीय जनतेने मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दृढ केला आहे आणि त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले आहे.’ भारताची आर्थिक स्थिती स्थिर असतानाच, धोरणात्मक अनिश्चिततेच्या गर्तेत. यासोबतच त्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमांची माहिती दिली आणि सरकारचे (Budget 2024) लक्ष शेतकरी, महिला, तरुण आणि गरीबांवर असल्याचे सांगितले.
कृषी क्षेत्राला 1.52 लाख कोटींची तरतूद
सीतारामन यांनी सांगितल्याप्रमाणे कृषी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोदी सरकारने यंदाच्या बजेटमध्ये 1.52 लाख कोटींची तरतूद केली आहे. यावेळी कृषी क्षेत्राचा विकास हे सरकारची पहिली प्राथमिकता असल्याचा सांगितले गेलं. शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सरकार आणणार आहे. नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याशिवाय भाजीपाला वाहतुकीसाठी विशेष साखळी तयार करणार असल्याचं या बजेटमध्ये सांगण्यात आलं. एवढेच नव्हे तर डिजिटल प्लॅटफॉर्मची सोबत घेऊन शेतकऱ्यांसाठी विविध योजनाही आणल्या (Budget 2024) जातील असं या बजेटच्यादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं
आतापर्यंतचे ठळक मुद्दे
- कृषी क्षेत्राचा विकास ही सरकारची पहिली प्राथमिकता
- कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद
- शेतीसाठी विविध योजना आणणार
- शेतकऱ्यांना साठी डिजिटल (Budget 2024) प्लॅटफॉर्म
- नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न
- भाजीपाला वाहतुकीसाठी विशेष साखळी तयार करणार
- महिलांच्या रोजगार निर्मिती साठी विशेष भर देणार
- ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न
- सहकार क्षेत्राचा विकास करून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारणार
- रोजगार निर्मिती साठी 2 लाख कोटी खर्च करणार
- गरीब कल्याण अन्न योजना आणखी 5 वर्ष वाढवली
- शैक्षणिक कर्जासाठी 3 टक्के व्याजाची सूट मिळणार
- नव्या व्यवसायासाठी युवकांना कर्ज देणार
- देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत सरकार (Budget 2024) मदत करणारपीएम विश्वकर्मा योजनेची व्याप्ती वाढवणार
- ग्रामीण भागाच्या विकासासाठी 2 लाख कोटींची तरतूद
- मुद्रा लोणचे कर्ज 20 लाख पर्यंत वाढवण्यात आले
- इंडिया पोस्ट बँकेच्या 100 शाखा उघडणार
- EPFO कर्मचाऱ्यांसाठी 3 नव्या योजना
- 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटरशिप देणार
- इंटरशिप करणाऱ्या तरुणांना दरमहा 5000 रुपये देणार