Budget 2024 । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला देशाचे अंतरिम बजेट सादर करतील. यावेळी सरकार कोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या योजना राबवते? त्यासाठी किती रुपयांचा निधी देते त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे. शेतकरी, महिला वर्ग, युवक याना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार सुद्धा मोठमोठ्या घोषणा करू शकते.
PM किसान योजनेची रक्कम वाढणार?
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणली होती. या योजनेअंतर्गत देशातील गरीब शेतकऱ्याला सरकारकडून दरवर्षी ६ हजार रुपये देण्यात येतात. प्रत्येकी २००० रुपयांच्या ३ हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. या पैशामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक हातभार मिळतोय. मोदी सरकारची ही योजना सर्वसामान्य जनतेला चांगलीच आवडलेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget 2024) सरकार हीच रक्कम ६००० वरून ८००० रुपये करण्याची सुद्धा शक्यता आहे. असं झाल्यास मोदींचा हा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक ठरेल.
महिला शेतकऱ्यांना किती रक्कम मिळेल??
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना दरवर्षी १० ते १२ हजार रुपये देण्याची घोषणाही सरकार करू शकते. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी तसेच आर्थिकदृष्टया त्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार ठोस पाऊले उचलण्याची शक्यता आहे. यापूर्वी सुद्धा सरकारने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत त्यांच्या सक्षमीकरणावर जोर दिला होता. तसेच मनरेगासाठी महिलांना विशेष आरक्षण आणि उच्च मानधनाची अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून आहे.
अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा होऊ शकतात? Budget 2024
शेतकऱ्यांना पिकांसह आरोग्य आणि जीवन विमा मिळण्याची शक्यता आहे.
महिलांसाठी कौशल्य विकास योजना सरकार राबवू शकते.
किसान सन्मान निधीची रक्कम वाढण्याची शक्यता
घरासाठी व्याज सवलत योजना जाहीर होण्याची शक्यता
महिलांसाठी बजेटमध्ये विशेष आर्थिक तरतूद केली जाऊ शकते.
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत महिला शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळू शकतात.