Budget 2024 Health Sector : 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींचे मोफत लसीकरण; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

0
1
Budget 2024 Health Sector Vaccination
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Budget 2024 Health Sector : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२४ चे अंतरिम बजेट सादर केलं. यावेळी आगामी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सरकार कडून अनेक वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये सर्वात महत्वाच्या असलेल्या आरोग्य क्षेत्रावरही अर्थमंत्र्यांनी भाष्य केलं. सर्वाईकल कॅन्सर रोखण्यासाठी 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण (Free Vaccination) मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. मिशन ‘इंद्रधनुष’ अंतर्गत हे अभियान सुरू करण्यात येणार आहे असं त्यांनी म्हंटल.

आरोग्य क्षेत्रासाठी सरकारच्या कोणकोणत्या घोषणा – Budget 2024 Health Sector

केंद्र सरकार 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना सर्वाईकल कॅन्सरची लस मोफत पुरवणार

आयुष्मान भारत योजनेंतर्गत आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना आरोग्य सेवा पुरविल्या जातील.

माता आणि बाल आरोग्य सेवेसाठी विविध योजना राबवल्या जातील. अंगणवाड्यांचा दर्जा वाढविला जाईल. Budget 2024 Health Sector

बालकांची काळजी आणि पौष्टिक आहाराची उपलब्धता सुधारण्यासाठी “सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0” अंतर्गत अंगणवाडी केंद्रांच्या कामाला गती दिली जाईल. यामुळे कुपोषणाची समस्या टाळता येईल.

मिशन इंद्रधनुष योजनेच्या माध्यमातून लसीकरणासाठी U-WIN प्लॅटफॉर्म सुरू केला जाईल. याद्वारे बालकांचे लसीकरण अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणा-या अनेक प्रकारच्या आजारांपासून लहान बालके सुरक्षित राहतील.

दुग्धजन्य प्राण्यांसाठी विविध प्रकारच्या रोगांचे प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी प्रयत्न केले जातील.

वैद्यकीय शिक्षण सुलभ व्हावे यासाठी देशात वैद्यकीय महाविद्यालये वाढवण्याची सरकारची योजना आहे.