औरंगाबाद प्रतिनिधी । नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणा-यांविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे याचा मोठा फटका रिक्षा चालकांना बसत आहे. या कारवाईत आतापर्यंत 60 वाहने जप्त केली असून यामध्ये चाळीस ऑटो रिक्षा आणि 20 दुचाकी वाहनांचा समावेश आहे.
ही वाहने सोडवण्याकरिता रेल्वे सुरक्षा दलातील जवनांकडून आरेरावीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप काही ऑटो चालकांनी केला आहे. तसेच मनमानी पद्धतीने दंडाची रक्कम आकारत असल्याची तक्रारही ऑटो चालकांकडून करण्यात येतीयं. रेल्वेस्थानक परिसरात नो-पार्किंगमध्ये रिक्षा व दुचाकी वाहने उभी करू नये तसेच धूम्रपान करू नये अशा सूचना रेल्वेसुरक्षा बलाने वारंवार देऊनही काहीजण जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत आहे.
त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून नियम तोडणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे यामध्ये रेल्वेस्थानक परिसरात 50 जण धूम्रपान करताना आढळून आले. त्यांच्यावर रेल्वे सुरक्षा बलाचा अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करून पाच हजार रुपये दंड वसूल केला आहे त्याबरोबर रेल्वेस्थानक परिसरात वाहतुकीचा नियमांकडे दुर्लक्ष करत नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या 60 वाहनधारकांवर कारवाई केली आहे त्यामध्ये 40 ऑटो रिक्षा व 20 दुचाकी वाहने रेल्वे सुरक्षा बलाने जप्त केली आहे.