Budget | आज म्हणजेच मंगळवारी 27 फेब्रुवारी 2024 रोजी वर्ष 2024 चा राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 8 हजार 609 कोटी 17 लाख रुपयांच्या पुरवण्या मागण्या उपमुख्यमंत्री आणि तसेच वित्तमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडलेले आहेत.
यावेळी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळ, वारा यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच फळबागांचे खूप मोठे नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानासाठी 2 हजार 210 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. त्यापैकी 1662 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी देखील मागण्यात आलेली आहे.
यावेळी पुरवणी मागणीत महावितरण कंपनीच्या कृषी पंप, यंत्रमाग तसेच वस्त्रोद्योग ग्राहकांना राज्य सरकारकडून अनुदान झालेले शेतीची नुकसान भरपाई यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग विभाग विभागाकडून त्यांना अनुदान मिळणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रोच्या कर्जासाठी तसेच न्यायिक अधिकाऱ्यांच्या थकीत भत्त्याच्या रकमेसाठी पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या.
यामध्ये 8609 कोटी 17 लाख रुपयांची पुरवण्या मागण्यांपैकी 5665 कोटी 48 लाख रुपयांच्या मागण्या या अनिवार्य आहेत. तसेच 2 लाख 943 कोटी 69 लाख रुपयांच्या मागण्या खर्चाच्या आहेत. या मागण्यापैकी भार हा 6591 कोटी 45 लाख रुपयांचा आहे. यासाठी आता या मागण्या मंजूर केल्या जाणार आहेत.
त्याचप्रमाणे मुंबई पुणे तसेच नागपूर मेट्रोच्या कर्जाच्या थकबाकीची परतफेड करण्यासाठी 1438 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच न्यायिक अधिकाऱ्यांच्या थकीत त्याच्या रकमेसाठी तब्बल 1828 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
एसटी महामंडळाला प्रवासी कराची रक्कम राज्य सरकारची भांडवली अंशदान देण्यासाठी 2009 कोटी तर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नगरपरिषदा आणि महापालिकांना सहाय्य अनुदान म्हणून 100 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे.