हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 26 फेब्रुवारी 2024 पासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण होईल. यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणा संदर्भात आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर करण्यात येईल. या अधिवेशनामध्ये 2023-24 चा पुरवणी मागण्या सादर करण्यात येतील. त्यानंतरच शासकीय कामकाजाला सुरुवात करण्यात होईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
समोर आलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारीपासूनच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होईल. अधिवेशनाच्या (Budget Session) शासकीय कामकाजाला 28 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. त्यानंतर सन 2024 -25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात सादर केला जाईल. पुढे 29 फेब्रुवारी रोजी म्हणजेच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येईल.
महत्वाचे म्हणजे, शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अर्थमंत्री असल्यामुळे यावर्षीचे अर्थसंकल्प त्यांच्यामार्फत सादर करण्यात येईल. त्यामुळे या अर्थसंकल्पात करण्यात येणाऱ्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष असेल.