Monkey Fever : वेगाने पसरतोय जीवघेणा ‘माकड ताप’; जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monkey Fever) संपूर्ण जगभराने कोरोनाचा हाहाकार पाहिला. त्यानंतर जीवनमान सुरळीत होण्यासाठी बराच वेळ गेला. अशातच आता माकड तापाची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. आतापर्यंत कर्नाटकापासून महाराष्ट्रात आणि गोव्यातदेखील माकड तापाचे रुग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. अत्यंत वेगाने पसरणाऱ्या माकड तापाचा विळखा आता हळू हळू घट्ट होऊ लागला आहे. त्यामुळे माकड तापाविषयी महत्वाची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.

कर्नाटकात माकड तापाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे या वेगाने पसरणाऱ्या माकड तापाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. (Monkey Fever) एका वृत्तानुसार, कर्नाटकात माकड तापामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्र आणि गोव्यातही माकड तापाचे रुग्ण आढळले आहेत. एकंदरच माकड ताप जीवघेणा ठरतोय असे दिसून आले आहे. चला तर जाणून घेऊया माकड ताप म्हणजे नक्की काय? त्याची लक्षणे कोणती आणि प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत?

माकड ताप म्हणजे काय आणि तो कसा होतो? (Monkey Fever)

भारत सरकारच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी’ या संस्थेने ‘पब्लिक हेल्थ अलर्ट’ म्हणून घोषित केलेला ‘माकड ताप’ हा कॅसनूर फॉरेस्ट डिसीज (केएफडी) आहे. हा एक असा आजार आहे जो प्राण्यांमूळे मानवांमध्ये पसरू शकतो. माकड या प्राण्याच्या शरीरात टिक्स आढळतात. जे माणसाला चावल्याने हा विषाणू मानवी प्रजातीत पसरू शकतो. त्यामुळे माकड ताप हा मानवी जीवनावर आघात करणारा धोकादायक विषाणू असल्याचे बोलले जात आहे.

(Monkey Fever) माकड ताप होण्याची काही विशिष्ट कारणे आहेत. जसे कि माकडाच्या शरीरात आढळणाऱ्या टिक जर माणसाला चावल्या तर माकड तापाचे संक्रमण होऊ शकते. तसेच जर एखाद्या संक्रमित प्राण्याशी माणसाचा संपर्क आला तरीही माकड ताप होऊ शकतो. इतकेच नव्हे तर, आजारी किंवा नुकत्याच मेलेल्या माकडाच्या संपर्कात आल्याने देखील माणसांमध्ये माकड तापाचे संक्रमण होऊ शकते.

माकड तापाची लक्षणे काय?

माकड तापाची काही प्रमुख लक्षणे आहेत. (Monkey Fever) ज्यामध्ये अचानक ताप येणे, अंग मोडून येणे, तीव्र डोकेदुखी होणे, उलट्या आणि अतिसाराचा त्रास होणे, स्नायू दुखावणे, गॅस्ट्रो, अशक्तपणा, नाक आणि हिरड्यांमधून रक्त येणे अशी लक्षणे आढळ्यास सगळ्यात आधी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

माकड तापाला प्रतिबंध कसा कराल?

तूर्तास माकड तापावर कोणताही विशिष्ट उपचार अस्तित्वात नाही. माकड तापाला प्रतिबंध करण्यासाठी प्राथमिक स्वरूपात वर दिलेली लक्षणे आढळ्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करा. तसेच आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी व्यायाम, सकस आहार आणि फळांचे सेवन करा. याशिवाय जास्तीत जास्त पाणी प्या. घरगुती आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या. स्वच्छतेची काळजी घ्या. (Monkey Fever)