आश्चर्यकारक! म्हशीने दिला चक्क पांढर्‍या रेडकाला जन्म

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

जगात दररोज अनेक आश्चर्य कारक घटना घडत असतात. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अडुळ येथे घडली असुन काळ्या म्हैशीने चक्क पांढर्‍या रेडकाला जन्म दिला आहे. अनेक म्हैशीना सर्वसाधारण भुरकट पांढरे ठिपके असणारी रेडके होतात. मात्र अडुळ येथील ज्ञानदेव तुकाराम शिर्के या शेतकऱ्यांच्या पाळीव म्हैशीने चार दिवसांपुर्वी गायीच्या वासरा सारख्या पांठऱ्या शुभ्र रेडकाला जन्म दिला. ही दुर्मिळ घटना असुन पांढरे रेडकु पाहुन शिर्के कुठुबियांसह गावकरी आश्चर्य चकित झाले आहेत.

रेडकू पाहण्यासाठी तालुक्यातुन लोक येत आहेत. म्हैशीने जन्माला घातलेले पिल्लू गायीचे वासरु आहे कि घोड्याचे पिल्लु (शेंगरु) याबाबत लवकर समजत नव्हते. आम्हाला ही आश्चर्य वाटत असुन आमचे घरी पांठरे रेडकु जन्माला आले याचा सर्व परिवाराला आनंद झाला आहे अशी भावना शिर्के यांनी व्यक्त केलीय.

याबाबत पशुवैद्यकीय तज्ञांकडुन माहिती घेतली असता अशा घटना दुर्मिळ असुन महाराष्ट्रात सुरती नावाची एक म्हैशीची जात असुन या जातीच्या म्हैशीमध्ये अशा पांढऱ्या रंगांचे जनुकिय आढळतात. अशा म्हैशीचे संकर त्याच जातीच्या बीजांशी झाला व पांठऱ्या रंगांच्या जनुकियांचे प्रमाण 50 टक्कयापेक्षा जास्त असेल तर असे पांठऱ्या रंगांचे रेडकु जन्माला येते. पुढे वाढत्या वयाबरोबर हा रंग फिकट भुरका होतो अशी माहिती दिली. मात्र सध्या पाटण तालुक्यातील लोकांमध्ये पांढर्‍या रेडकाची जोरदार चर्चा व कुतुहल आहे.

https://www.facebook.com/hellokrushi/videos/2416632868645094/