बाप रे! तब्बल 23 कोटींचा रेडा; खुराकात खातो काजू आणि बदाम, कोणती आहे जात?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोक हे पाळीव प्राणी पाळतात. या पाळीव प्राणी पाळण्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. परंतु आजकाल अनेक लोक रेडा देखील पाळतात. आणि या रेड्याची किंमत बाजारात खूप जास्त आहे. तुमच्या डोळ्यांवर तुम्हाला विश्वास मिळणार नाही. एवढी किंमत तुम्हाला या रेड्यासाठी मोजावी लागते. जर तुमच्याकडे रेडा असेल आणि तो जर कोणाला विकत घ्यायचा असेल? तर तुम्ही कोट्याधीश झालाच म्हणून समजा.

अनेक पशु मेळावे देखील होत असतात. आणि अशातच आता राजस्थान आंतरराष्ट्रीय पुष्कर पशु मेळाव्याला सुरुवात झालेली आहे. अजमेर पासून 15 किलोमीटर अंतरावर हा मेळावा आहे. हा मेळावा 9 ते 15 नोव्हेंबर पर्यंत चालू आहे. आणि या काळात या ठिकाणी विविध प्रजातींचे प्राणी विक्रीसाठी ठेवले जातात. अनेक राज्यातून लोक या ठिकाणी येतात. आणि त्यांना पाहिजे ते प्राणी घेऊन जातात. परंतु या मेळाव्यामध्ये हरियाणाच्या अनमोल नावाच्या रेड्याची मोठ्या प्रमाणात चर्चा चालू झालेली आहे. हा रेडा या मेळाव्याचा एक केंद्रबिंदू ठरलेला आहे. फक्त या रेड्याला पाहण्यासाठी अनेक लोक दूर राज्यातून देखील येत आहे.

अनमोल या रेड्याच्या मालकाचे नाव पलविंदर सिंग असे आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रेडा मुर्रा प्रजातीचा आहे. तो सध्या आठ वर्षाचा आहे. आणि त्याचा खुराक देखील खूप जास्त आहे. या रेड्याला दररोज जवळपास 1500 रुपयांचा खर्च लागतो. तो ताजी फळे, काजू आणि बदाम देखील खातो.

अनमोलची किंमत किती

या मेळाव्याच्या वेळी अनमोलचे मालक पलविंदर सिंग यांनी सांगितले की, “अनमोलला सध्या बाजारात प्रचंड मागणी आहे. दररोज त्याच्यासाठी अनेक ग्राहक विचारणा करतात. खरंतर मुर्रा प्रजातीचा सर्वच रेड्यांची चांगली किंमत मिळते. त्यात अनमोल दिसायला खूपच रुबाबदार आणि ताकदवान आहे. त्यामुळे त्याची किंमत तब्बल 23 कोटी एवढी आहे. परंतु मी त्याला कधीच विकण्याचा प्रयत्न केला नाही. आणि भविष्यात देखील त्याला विकणार नाही. मी त्याला अगदी भावासारखे वाढवला आहे. आणि तो आता माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे.”

अनमोलच्या शुक्राणूंना मोठी मागणी!

अनमोल ला सध्या बाजारात खूप जास्त मागणी आहे. तरी देखील पलविंदर सिंग त्याची विक्री करत नाही. तर तो कसा रुबाबदार आणि सुदृढ दिसेल याकडे ते स्वतःच्या खिशातून खर्च करत असतात. त्याचा दररोजचा खर्च देखील भागवत असतात. सध्या बाजारामध्ये अनमोलच्या शुक्राणूंना देखील खूप जास्त मागणी आहे. या प्रजातीचे आणखी रेडी आणि म्हशी जन्माला याव्यात यासाठी हे शुक्राणू खरेदी केले जातात.