हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “दरवर्षी पावसाळ्यात पवना आणि मुळा नदीला पूर आला की सांगवी आणि दापोडी या भागांना पुराचा जोरदार फटका बसतो.घराघरात पाणी शिरते परिणामी लोकांना प्रचंड मानसिक ताण आणि आर्थिक नुकसान सोसावे लागते.या सगळ्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आम्ही नदीची पाहणी केली असता कळस आणि खडकी भागात इंग्रज काळात बांधलेला बंधारा कारणीभूत आहे,यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढते व पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते.ही परिस्थिती बदलण्यासाठी तो जूना बंधारा पडून त्याजागी नवीन आणि आधुनिक स्वरूपातला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधावा अशी आग्रही मागणी पिंपरी – चिंचवड महानगरपालिका माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांनी एका पत्रकाद्वारे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
सोबतच पत्रकात असे देखील म्हटले आहे की “पूर्वी डेअरी फार्म व पिंपळे – गुरव भागात पवना नदीवर असलेल्या बंधाऱ्यामुळे देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होत होती.पण त्या ठिकाणी असलेला बंधारा तोडल्यामुळे पूररेषा ही दोन मीटरने खाली गेली असल्याचे निदर्शनास आले आहे.अगदी त्याच पद्धतीने कळस आणि खडकी भागात असलेल्या बंधाऱ्याचे देखील पुनर्निर्माण व्हावे,तसेच याच बंधाऱ्यातून ऑम्यूनिशन फॅक्टरी साठी २४ बाय ७ पॅम्पिंग केलं जातं.त्यातूनच ही फॅक्टरी फायर फायटिंग साठी सज्ज राहते म्हणून या बंधाऱ्याच्या जागी कोल्हापूर पद्धतीचा आधुनिक बंधारा निर्माण व्हावा अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा