अमरावती : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहे. यादरम्यान अमरावतीमध्ये एक थरकाप उडवणारी घटना (building collapse) घडली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाला जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये अमरावतीमधील एक दुमजली इमारत (building collapse) जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पावसामुळे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/d0BJkgF8M8
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 14, 2022
अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाने जोरदार थैमान घातले आहे. अशातच आज अमरावती शहरातील गांधी चौक-राजापेठ रोडवर असलेली एक दुमजली इमारत (building collapse) कोसळली. काल रात्रीच इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्व इमारत रिकामी केली होती. त्यामुळे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने या दुर्घटनेत (building collapse) कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
तापाने फणफणत असलेल्या लेकासाठी बापाने पुरातून काढला रस्ता
तापाने फणफणत असलेल्या चिमुकल्या पोराला घेऊन बाप पुरात शिरला आणि पोरावर उपचार करून सुखरूप परतसुद्धा आला. गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील रहिवासी असलेल्या श्यामराव पत्रूजी गिनघरे यांच्यावर ही वेळ आली मात्र बाप यातही धीराने उभा राहिला. गावात नीट आरोग्य सुविधा नाही. त्यात नदी, नाल्यांना पूर आला अशातच आजारी मुलाला खांद्यावर घेत बापाने पुरातून मार्ग काढीत उपचार करण्यासाठी दुसऱ्या गावाला घेऊन गेला.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?