बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – मलकापुर मार्गावरील राजूर घाटात एक ट्रक पलटी (truck accident) झाला होता. त्यामुळे या घाटातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. यानंतर काही वेळातच हा पलटी झालेला ट्रक सुरक्षा भिंत तोडून दरीत कोसळला(truck accident). मात्र सुदैवाने हा ट्रक अधिक खोल न जाता झाडामुळे काही अंतरावर अडकून पडला. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक जवळपास दीड तास विस्कळीत (truck accident) झाली होती.
राजूर घाटात ट्रक पलटी होऊन दरीत कोसळला, व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/fqkdHVoHr1
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 11, 2022
काय घडले नेमके ?
हाती आलेल्या माहितीनुसार, मलकापूरहुन बुलढाण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचालकाचे राजूर घाटातील एका वळणावर नियंत्रण सुटले. त्यानंतर हा ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला होता. या ट्रकला क्रेनच्या साह्याने उभे करण्यात आले होते मात्र यानंतर काही वेळाने हा ट्रक घाटाची सुरक्षा भिंत तोडून दरीत कोसळला (truck accident).
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी हि ट्रक पलटी होतानाची संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. हा ट्रक अधिक खोल दरीत न जाता झाडात अडकला (truck accident) आहे अशी माहिती बोराखेडीचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय