हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bullet Train) दगदगीच्या आयुष्यातील प्रवास किंचित सुखकर करणाऱ्या मेट्रो ट्रेननंतर आता सर्वांना वेध लागलेत बुलेट ट्रेनचे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन हा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत येणार आहे. माहितीनुसार, २०२६ पर्यंत मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई- अहमदाबादमधील अंतर केवळ २ तासांत कापता येणार आहे. दरम्यान, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेन स्थानकांच्या कामाला आता गती मिळाली आहे.
ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात (Bullet Train)
येत्या काळात महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे जाळे पसरताना दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर पालघर आणि ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या स्थानकांचे काम सुरु करण्यात आले आहे. माहितीनुसार, हा प्रकल्प ५०८ किमी लांबीचा असून हा मुंबई – अहमदाबाद कॉरिडोअरचा (NHSRCL) एक भाग आहे. या प्रकल्पाची सर्व जबाबदारी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडवर सोपवण्यात आली आहे. NHSRCL द्वारा एक प्रसिद्धीपत्रकदेखील सादर करण्यात आले आहे. ज्यामध्ये या प्रकल्पाबाबत महत्वाची माहिती प्रदान करण्यात आली आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पॅकेज- C3 भाग
NHSRCL च्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, या प्रकल्पाचे काम बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पॅकेज- C3 चा भाग म्हणून केले जात आहे. यात शिळफाटा ते महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत विस्तारणाऱ्या बुलेट ट्रेनचा (Bullet Train) समावेश आहे. माहितीनुसार, हा पट्टा सुमारे १३५ किमी लांबीचा असून त्याच्या कामाचा तांत्रिक तपास सुरुआहे. या ठिकाणी दोन पर्वतीय बोगद्यांचेदेखील काम करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी विशिष्ट अंतरावर खांब उभारण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, गर्डर्सच्या पूर्ण स्पॅन आणि सेगमेंट कास्टिंगसाठी कास्टिंग यार्डसुद्धा विकसित केले जात आहेत.
उल्हास, वैतरणा आणि जगनी नद्यांवर क्रॉसिंग
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पॅकेज C3 भागाच्या पट्ट्याची लांबी १३५.४५ किमी इतकी आहे. यात ५.३६१ किमी भूभाग वापरून २४.०२७ किमी लांबीचे मार्ग आणि पूल तयार करण्यात आले आहेत. ज्यात १२ स्टील पुल, ३६ पूल आणि क्रॉसिंगचा समावेश आहे. मुख्य म्हणजे, या प्रकल्पात ६ पर्वतीय बोगदे आणि एक कट-अँड-कव्हर बोगदादेखील आहे. (Bullet Train) विशेष असे की, हा मार्ग ३ मुख्य नाड्यांवरून क्रॉस केला जात आहे. उल्हास, वैतरणा आणि जगनी या नद्यांवर क्रॉसिंग असेल अशी माहिती NHSRCL ने दिली आहे. या पूर्ण भागात ठाणे, विरार आणि बोईसरदरम्यान एकूण ३ बुलेट ट्रेन स्थानकांचा समावेश असेल.
समुद्राखालील पहिल्या बोगद्याचं बांधकाम सुरु
प्रसिद्धीपत्रकात असेही सांगितले आहे की, या प्रकल्पाचा एक भाग म्हणून समुद्राखालील पहिल्या बोगद्याचं बांधकाम सुरु करण्यात आलं आहे. या बोगद्याची लांबी २१ किमी इतकी असेल. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथे भूमिगत स्थानकांदरम्यान हा पट्टा तयार केला जात आहे. बोगदे तयार करण्यासाठी ३ बोरिंग मशीन्स सुमारे १६ किमी भागांसाठी वापरल्या जात आहेत. (Bullet Train)
एकूण 1.08 लाख कोटी खर्च होणार
मोदींचा ड्राइम्प्रोजेक्ट असलेल्या मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडोअर प्रकल्पासाठी एकूण १.०८ लाख कोटी रुपये इतका खर्च होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. यात भारत सरकार NHSRCL ला १० हजार कोटी रुपये देणार आहे. तर गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना प्रत्येकी ५,००० कोटी रुपये देण्यात येतील. प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, उर्वरित रक्कम ही जपानकडून ०.१% व्याजाने कर्जाद्वारे दिली जाणार आहे. सध्या (Bullet Train) या प्रकल्पाच्या कामाने चांगला जोर धरला असून प्रत्येकजण बुलेट ट्रेन कधी सुरु होणार? या प्रतीक्षेत आहे.