Bullet Train : बुलेट ट्रेन कधी धावणार?? रेल्वेमंत्र्यांनी तारीखच सांगून टाकली

Bullet Train Updates
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bullet Train। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे. भारतातील हि पहिलीच बुलेट ट्रेन असल्याने ती कधीपासून सुरु होणार? याची उत्सुकता लागली आहे. आता खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच बुलेट ट्रेन पटरीवर कधी धावणार याबाबत अपडेट दिली आहे. संसदेत बोलताना अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल कि, २०२९ पर्यंत मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे संपूर्ण काम पूर्ण होईल.

बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) कामाबाबत अपडेट्स देताना अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल, वापी ते साबरमती दरम्यान बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होईल. महाराष्ट्र ते साबरमती विभागाचा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होईल. बुलेट ट्रेन प्रकल्प खूप गुंतागुंतीचा आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. त्याच्या पूर्णतेचा अचूक कालावधी तेव्हाच निश्चित करता येईल जेव्हा त्याच्याशी संबंधित सर्व बांधकाम कामे जसे की नागरी संरचना, ट्रॅक, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन, ट्रेनसेट्सचा पुरवठा पूर्ण होईल.

अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा (Bullet Train) एकूण खर्च १,०८,००० कोटी रुपये आहे, त्यापैकी ८१ टक्के म्हणजे ८८,००० कोटी रुपये जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जिका) कडून निधी दिला जात आहे, तर राहिलेल्या २०००० कोटीमधील १०००० कोटी महाराष्ट्र सरकार आणि १०००० कोटी रुपये गुजरात सरकार देत आहे. ३० जून २०२५ पर्यंत या प्रकल्पावर एकूण ७८,८३९ कोटी रुपये खर्च झाले आहेत अशी माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली.

कुठून कशी धावणार बुलेट ट्रेन ? Bullet Train

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, महाराष्ट्र, दीव दमन आणि गुजरात मधून धावेल. या बुलेट ट्रेनला मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती असे १२ थांबे असतील. अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल कि, ३९२ किमी घाट बांधकाम, ३२९ किमी गर्डर कास्टिंग आणि ३०८ किमी गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण झाले आहे. तर समुद्राखालील बोगद्याचे (सुमारे २१ किमी) काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रात भूसंपादनास विलंब झाल्यामुळे २०२१ पर्यंत प्रकल्प प्रभावित झाला होता. मात्र सध्या MAHSR प्रकल्पासाठी संपूर्ण जमीन (१३८९.५ हेक्टर) संपादित करण्यात आली आहे. अंतिम स्थान सर्वेक्षण आणि भू-तांत्रिक तपासणी देखील पूर्ण झाली आहे आणि संरेखन देखील अंतिम करण्यात आले आहे.