Bullet Train : पुण्यातून धावणार बुलेट ट्रेन!! कसा असेल मार्ग? कधीपर्यंत पूर्ण होईल प्रकल्प?

Bullet Train Pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पुणे शहरातील (Pune City) मेट्रोची चर्चा चांगलीच जोर धरतीये. तिचे असलेले वैशिष्ट्य आणि लोकांची पसंती ह्यामुळे मेट्रोच्या चर्चा गावागावात होताना दिसून येत आहेत. आता अश्यातच येत्या काही वर्षात पुणेकराना बुलेट ट्रेनचा (Bullet Train) सुद्धा अनुभव घेता येणार आहे. एकीकडे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरु असताना देशातील सात ठिकाणी बुलेट ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये पुणे शहराचे नाव पुढे आले. आता हा मार्ग कसा असेल, आणि ही बुलेट ट्रेन नेमकी कधी रुळावर उतरेल याबाबत सविस्तर जाणून घेऊया. चा

सात नवीन मार्ग सुरु करण्याचा प्रस्ताव 

Bullet Train प्रकल्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरचे (एमएएचएसआर) काम अतिशय वेगाने सुरू आहे. मुंबई, अहमदाबादनंतर देशातील सात मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. त्यामध्ये मुंबई आणि हैद्राबादचा 709 किलोमीटरचा ट्रेनचा समावेश आहे. ह्यामध्ये NRP ने हाय स्पीड ट्रेनसाठी मार्ग शोधले आहेत. मुंबई -हैद्राबाद ट्रेनमुळे मुंबई बेंगळूरू मार्ग जोडला जाणार आहे.

कुठून कुठे जाणार हा मार्ग? Bullet Train

मुंबई,- हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन ही पुण्यातून जाणार आहे. ही बुलेट ट्रेन मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी या मार्गाने हैदराबादमध्ये जाणार आहे. या रेल्वेचा जास्तीत जास्त वेग 350 किलोमीटर प्रतितास असणार आहे.

2041 मध्ये सुरु होणार बुलेट ट्रेन

मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन ही पुणे शहरातून जाणार असून ती पुणेकरांच्या वापरास 2041 ह्या वर्षी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे मुंबई -अहमदाबाद ह्या बुलेट ट्रेनची खासियत?

या कॉरिडॉरवर 24 नदी पूल आहेत, त्यापैकी 20 गुजरातमध्ये आणि 4 महाराष्ट्रात आहेत. NHSRCL, भारतीय रेल्वेची पूर्ण मालकीची उपकंपनी, म्हणते की पहिला पूल पूर्णा नदीवर, दुसरा मिंधोला नदीवर आणि तिसरा पूल अंबिका नदीवर बांधण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 3681 कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी 559 मजूर रात्रंदिवस काम करत आहेत.

किती असेल ह्या ट्रेनची गती?

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) नुसार, बुलेट ट्रेन मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन कमाल 320 किमी प्रतितास वेगाने धावेल आणि मुंबई-अहमदाबाद दरम्यानचे संपूर्ण अंतर अवघ्या 127 मिनिटांत पूर्ण करेल.