Bulletproof Tea Benefits| आपल्याकडे अनेक लोक असे आहेतज्यांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट ही चहानेच होते. चहा पिल्याशिवाय त्यांचा दिवसच सुरू होत नाही. अनेकांना चहा हा त्यांचा एनर्जी ड्रिंक वाटतो. परंतु या चहामुळे आपल्याला अनेक शारीरिक तोटे सहन करावे लागतात. पित्त त्याचप्रमाणे मधुमेह यांसारख्या आजारांना या चहामुळे आपण आमंत्रण देत असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का? जर या चहामध्ये तुम्ही थोडासा बदल केला तर यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे तुम्हाला तुमचा ब्रेन खूप सुपर फास्ट करता येणार आहे.
हा एक हटके प्रकारचा चहा बनवून तुम्ही तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवू शकता यासाठी तुम्हाला चहामध्ये देशी तूप टाकून प्यावे लागेल. चहाची ही नवीन रेसिपी पाश्चिमात्य देशातून आली आहे. तिथे तूप किंवा लोणी घालून कॉफी पितात. याला बुलेटप्रूफ कॉफी म्हणतात. ही पद्धत चहावर देखील होते त्यामुळे चहा आणि देसी तुपाचे फायदे एकत्र करून तुम्हाला खूप चांगला परिणाम मिळेल. या ला बुलेट प्रूफ चहा (Bulletproof Tea Benefits) असे म्हणतात.
चहामध्ये घरगुती तूप मिसळून पिण्याचे फायदे
यासाठी तुम्ही सकाळच्या चहामध्ये एक चमचा देशी तूप घालून त्यात मिसळा आणि ते प्या. त्याचप्रमाणे दुधाच्या चहाऐवजी तुम्ही हर्बल चहा पिल्यास ते आणखी फायदेशीर होईल तुम्ही हा चहा दिवसातून 2 वेळा पिला तर त्याचे असंख्य फायदे तुम्हाला मिळतील.
मेंदूची ताकद वाढेल | Bulletproof Tea Benefits
चहामध्ये कॅफिन असते. जे आपल्या मेंदूला उत्तेजित करते आणि त्याची कार्यक्षमता देखील जास्त चालते. तुमची स्मरणशक्ती, शिकणे या सगळ्या गोष्टींवर याचा सकारात्मक परिणाम होतो. परंतु आयुर्वेदातील संशोधनानुसार देसी तुपात मध्य रासायन गुणधर्म असतात. ज्यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूची क्रिया वेगवान होते. आता या चहाचे शरीराला काय फायदे होतात हे आपण पाहूया.
चिंता आणि तणाव दूर
चहातील अँटिऑक्सिडंट आणि देसी तुपातील हेल्दी फॅट एकत्रितपणे तणाव कमी करण्याचे काम करतात. यामुळे तुमचा मूड सुधारतो, चिडचणीपणा कमी होतो. तसेच मेंदूला निरोगी राहण्यासाठी याची मदत होते.
एनर्जी होईल दुप्पट
बुलेट प्रुफ चहा (Bulletproof Tea Benefits) हा कॅलरी आणि पोषण यांचे मिश्रण आहे. हे तुम्हाला जीवनसत्त्वे खनिज आणि अँटिऑक्सिडंट देते. त्यामुळे अशक्तपणा, आळस, थकवा यांसारख्या गोष्टी दूर होतात. तुमच्या शरीरात आधीपेक्षा जास्त उत्साह निर्माण होतो.
इम्युनिटी बूस्टर ड्रिंक
चहामध्ये तूप टाकून पिले तर यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. तुम्ही जर अगदी रोज हा चहा पीत असाल तर हवामान बदलल्यावर देखील तुम्ही अजिबात आजारी पडणार नाही.