सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने आणि आम्ही प्रयत्न केले असल्याचे मत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केल आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा आदर करत खा. पाटील यांनी आभार मानले आहेत. तसेच बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्याने सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनी आनंद व्यक्त करताना म्हणाले, जोतिबाच्या नावानं चागंभलं, सिदोबाच्या नावानं चागंभलं.
सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने सातारा जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने साताऱ्यामध्ये बैलगाडा प्रेमींनी पोवई नाक्यावर असणाऱ्या शिवाजी पुतळ्याला हार घालून व एकमेकांना मिठाई वाटून तसेच बैलांच्या अंगावरती गुलाल उधळून बैलगाडा प्रेमींनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, बैल दुर्देवाने संरक्षित प्राण्याच्या यादीत घातला. काही ठिकाणी बैलांना पाजून, टोचून काय प्रकार केले ते चुकीचे आहे. खरा शेतकरी असतो, तो खाद मळतो, पोळ्या तुपात घालून घालतो. बैलगाडी बंद झाल्याने अशी जनावरे सांभाळणे अवघड झाले होते. आता शेतकऱ्यांना आनंद देण्यासाठी बैलाची चांगली निर्मिती करावी. आपले व आपल्या बैलाची संधी मिळवी,यासाठी संधी मिळाली. महाविकास आघाडी सरकारला बैलगाडी शर्यती सुरू करण्याची संधी मिळाली. पशु संवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी मीही लोकसभेत शर्यती सुरू करण्यासाठी प्रयत्न केलेत.