बैलगाडा शर्यतीला अखेर परवानगी : महाराष्ट्रात धुरळा उडणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन |  राज्यात बैलगाडा शर्यंतीना महाराष्ट्रात परवानगी देण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शाैकिंनासाठी अत्यंत आनंदाची बातमी आज दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिलेली आहे.

महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच वर्षापासून बैलगाडी शर्यतीला बंदी घालण्यात आलेली होती. या बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू होता. राज्यात अनेकदा निर्बंध झुगारून बैलगाडी शर्यंती आयोजित केल्या जात होत्या. त्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल झालेले आहेत. बैलगाडी शर्यंतीच्या विरोधात पेटाकडून जोरदार प्रयत्न होते. मात्र अखेर सुप्रीम कोर्टाकडून बैलगाडी चालक,मालक व शाैकिंनासाठी आनंदाची बातमी दिली. राज्य सरकारच्या वतीने जोरदार युक्तिवाद केल्याने अखेर राज्यात बैलगाडीचा धुरळा उडणार आहे.

https://twitter.com/Princy_Vishu/status/1471380184808919044

या निर्णयानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले. तसेच या लढ्याचे व विजयाचे श्रेय बैलगाडी चालकांना दिले आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीसाठी काही, अटी घालून सशर्त परवानगी दिली आहे.

Leave a Comment