हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुनील नारायण …. कोलकाता नाईट रायडर्सचा आक्रमक सलामीवीर … आपल्या वादळी खेळीने नारायणने अनेकदा कोलकात्याला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. तसेच चौफेर फलंदाजी करत गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या आहेत. त्यामुळे भले भले गोलंदाज नारायण समोर निष्प्रभ ठरले … मात्र कालच्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात जसप्रीत बुमराहने पाहिल्याचे चेंडूवर धारधार यॉर्कर टाकला आणि नारायच्या दांड्या गुल केल्या .. याबाबतचा विडिओ सुद्धा समोर आला आहे.
जसप्रीत बुमराहने मुंबईच्या डावाचे दुसरे षटक टाकलं. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर बुमराहनं टाकलेला भन्नाट यॉर्कर सुनील नारायणला समजलाच नाही …. नारायणनने तो बॉल सोडला आणि थेट स्टॅम्पवर जाऊन आदळला. बुमराहनं टाकलेला बॉल कधी स्टम्पवर जाऊन आदळला हे सुनील नारायणला समजलचं नाही. U Miss I Heat प्रमाणे नारायणाच्या दांड्या गुल झाल्या.. अतिशय अचूक टाकलेल्या यॉर्कर बॉलवर नारायण चितपट झाला आणि पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची नामुष्की नारायणवर आली.
You miss, I hit 🎯⚡️
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2024
A rare golden duck in Kolkata for Sunil Narine! 😲
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #KKRvMI pic.twitter.com/0DQsKdXDhD
दरम्यान, यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय सुमार राहिली असली तरी भारताच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे जसप्रीत बुमराह आपल्या नेहमीच्या फॉर्मात दिसत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 20 विकेट घेत त्यानं पर्पल कॅपवर नाव कोरलं आहे. जसप्रीत बुमराहच्यानंतर हर्षल पटेलनं देखील 20 विकेट घेतल्या आहेत. मात्र, त्यानं धावा अधिक दिल्या आहेत. अचूक लाईन आणि लेन्थ,,, गरजेच्या वेळी बाउन्सर आणि देठ ओव्हर मध्ये दमदार यॉर्कर टाकत बुमराह समोरच्या फलंदाजाला कोड्यात टाकत आहे. बुमराहचा चांगला फॉर्म हीच एकमेव भारतासाठी दिलासादायक गोष्ट आहे.